Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

धुळे महानगरपालिका चे स्ट्रीट लाईट वाल्यांवर नियंत्रण आहे का ? धुळे….१९/१२/२०२१…. धुळे महानगरपालिका चा कारभार वाऱ्यावर आहे का?? असा प्रश्न सामान्य जनता करत आहे.



धुळे महानगर पालिका कार्यक्षेत्रात पारोळा रोड वरील शेतकरी श्रमगौरव पुतळ्या पासून तर थेट जळगाव चौफुली ब्रिज पर्यंत स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी कुणीही मनपाचा लाईट मान याठिकाणी येत नसल्याची तक्रार वारंवार सामान्य जनतेकडून केली जात आहे. मात्र याची दखल कुणीही घ्यायला तयार नाही. सध्या थंडीचे दिवस असल्याने सव्वा सहा वाजता अंधार पडून गेलेले असते. या परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक पायी चालण्यासाठी महिला, पुरुष, व तरुण मुले मुली या थेट पुलापर्यंत जळगाव चौफुली पर्यंत जात असतात. मात्र शेतकरी पुतळ्यापासून ते थेट जळगाव चौफुली ब्रिज पर्यंत स्ट्रीट लाईट सतत बंद असल्याचे सामान्य नागरिकांना आढळलेले आहे. आत्ता देखील साप्ताहिक पोलीस व्हिजन कडे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया कळवली आहे. संपादक या नात्याने प्रत्यक्ष सत्यता पडताळून पाहण्यासाठी मी स्वतः गेलो आणि थेट शेतकरी पुतळ्यापासून ते जळगाव चौफुली ब्रिज पर्यंत पायी जाऊन आलो अतिशय अंधार त्याच स्ट्रीट लाइट सुरू नाहीत ही गंभीर परिस्थिती पाहून आम्हाला देखील भीती वाटत होती. महिला व तरुण मुलींना या अंधाराचा प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. त्यांच्या जीविताला धोका देखील निर्माण झालेला आहे. टवाळखोर मुले किंवा अंधाराचा फायदा घेऊन स्त्रियांना व मुलींची छेड काढण्याचा देखील प्रकार होऊ शकतो अशी भीती आहे? प्रत्यक्ष स्ट्रीट लाईट ची जबाबदारी नेमकी कोणाची?? हा प्रश्न कायम आहे. यावर मनपाचे आयुक्त साहेब यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता सव्वा सात वाजले आहेत परंतु अद्याप स्ट्रीट लाइट सुरू करायला कोणीही या ठिकाणी आलेले नाहीत. नेमका हा प्रकार मागील २३तारखेस देखील याची बातमी टाकण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर स्ट्रीट लाईट सुरू व्हायला सुरुवात झाली होती. आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे स्ट्रीट लाईट पुन्हा बंद आहेत. ज्या इसमावर ही जबाबदारी दिली असेल ते ती जबाबदारी पाहतात की नाही?? याची सामान्य नागरिकांची तक्रार आहे. सदर महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध