Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
राज्यातील कोरोना परिस्थिती पुन्हा ढासळण्याची चिन्हे मुख्यमंत्र्यांनी केली चिंता व्यक्त ओमीक्रोन चा वाढता आलेख पाहता पुन्हा निर्भध लागण्याची चिन्हे
राज्यातील कोरोना परिस्थिती पुन्हा ढासळण्याची चिन्हे मुख्यमंत्र्यांनी केली चिंता व्यक्त ओमीक्रोन चा वाढता आलेख पाहता पुन्हा निर्भध लागण्याची चिन्हे
राज्यातील कोरोना परस्थिती पुन्हा ढसळण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. (Night Curfew in Maharashtra) यासंदर्भात अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे.
राज्यातल्या कोविड (Covid19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स (Covid19 Task Force) सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष (New Year) स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.
ओमिक्रॉनची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमधून येणाऱ्या 15 दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचा पीक पिरेड असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलण्यात येत आहेत.
नक्की काय घडलं टास्क फोर्सच्या बैठकीत?
राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार
५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत
आज दुपारपर्यंत राज्यशासन नवी नियमावली जाहीर करणार
३१ जिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी
फटाके फोडता येणार नाहीत, आतषबाजी नाही
लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध
१०० जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा २०० होती.
बंदिस्त जागेतील कार्यक्रम
समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांसाठी 100 लोकांनाच परवानगी
२५% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू
ओपन ५०% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू100 लोकांनाच परवानगी
रेस्टरंट- 50% क्षमतेनच सुरु राहणार
प्रशासनाचं आता हॉटेल ,रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल
मुंबईची स्थिती काय?
३ महिन्यांनंतर मुंबईत अचानक स्पाईक
ऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या ५५० -६०० होती…
३ महिन्यांनंतर रुग्णसंख्यावाढ बघायला मिळतेय
मुंबईत दरदिवसाला 45 हजार टेस्टींग होत आहेत
काल बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?
जलद लसीकरण मोहीम
बुस्टर डोस बाबत केंद्राकजे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावा
केंद्राकडे लहानमुलांच्या लसिकरणासाठी पाठपुरावा करावा
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा