Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

पिंपळनेर वन खात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यालयिन वेळात आपल्या कार्यालयात उपस्थित नसतात


पिंपळनेर वन परिक्षेत्रातील वनखात्याचे अधिकारी वनसंरक्षक पिंपळनेर रेंजर श्री. माळके साहेब हे आपल्या कार्यालयीन वेळात कार्यालय यात उपस्थित राहत नसल्याचे बाब प्रकर्षाने समोर येत आहे. अनेक शेतकरी आपल्या शासकीय कामासाठी पिंपळनेर फॉरेस्ट ऑफिसला वारंवार फेऱ्या मारतात. परंतु अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे नाहक मंनस्थाप होतो आणि असे असताना देखील अधिकारी व त्यांचा कर्मचारी वर्ग सर्वसामान्य ग्रामीन शेतकरी लोकांना चुकीची वागणूक देतात. आणि वेळकाढूपणा करतात.आणि आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा देखील प्रयत्न करतात असे देखील समोर आले आहे. मुख्य बाब म्हणजे पिंपळनेर वनपरिक्षेत्र क्षेत्रातील येत असलेला वन जकात नाका शेलबारी येथे वन विभागाचे कुठलीही कर्मचारी आपल्या  पोस्टिंग केलेल्या जागेवर उपस्थित नसतात ही बाब स्वतः आमच्या पत्रकार मित्रांच्या केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये ही बाब समोर आली आहे. आणि सदर सर्व पुरावे ,तेथील स्थानिक लोकांचा मुलाखती  जिओ टेक फोटोज,व इ. आमच्याकडे प्रतिनिधी कडे उपलब्ध आहेत. या अनुषंगाने धुळे मुख्य वनसंरक्षक अधिकारी पगार साहेब यांच्याकडे वरील बाब लक्षात घेऊन पिंपळनेर वन परिक्षेत्राचे विभागाच्या सर्व मुख्य अधिकारी यांचे CDR रेकॉर्ड मिलने बाबत हि अर्जाद्वारे मागणी केली आहे. त्यात मुख्यत्वे शेलबारी जकात नाक्यावर कार्यरत असलेल्या  कर्मचारी हे दिवसा व रात्री चा वेळीही आपल्या कार्यालतात उपस्थित नसतात  हे आमचा निदर्शनास आले आहे या दोन्ही चा कार्यालयीन वेळात जेव्हा आम्ही नाक्यावर भेट दिली तेव्हा मात्र दिवसा आणि रात्री या दोन्ही कार्यालयीन वेळेत कुठलीही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते व एक खाजगी इसम तेथे शासकीय काम बजावत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली मुख्य संरक्षक धुळे यांनी या  बेशिस्त कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून योग्य ती कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी असे देखील परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध