Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्ट्यासह एकास केले जेरबंद
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्ट्यासह एकास केले जेरबंद
शिरपूर प्रतिनिधी – तालुक्यातील वाघाडी येथून धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्ट्यासह एकास जेरबंद करीत 4 जिवंत काडतुससह 57 हजराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शनिवारी सकाळी केली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे मध्यप्रदेशातील व्यक्ती गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना शनिवारी सकाळी मिळल्यावरून एलसीबीच्या पथकाने शोध घेतला असता वाघाडी गावातील वाडी रस्त्यावरील अश्विनी बिअरबार समोर रस्त्यावर संशयित मिळून आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 50 हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल 2 हजार रुपये किमतीच्या 4 काडतुस व मोबाईल असा 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत संशयित सुखराम रेतम पवार वय 23 रा. मु.पो. रायचुल,ता.पानसेमल जि.बडवाणी यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याप्रकरणी एलसीबीचे पोकॉ महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक,धुळे प्रशांत बच्छाव,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,
सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील,
पीएसआय योगेश राऊत,बाळासाहेब सुर्यवंशी,पोहेकॉ श्रीकांत पाटील,प्रभाकर बैसाणे,संजय पाटील,संदीप सरग,चव्हाण,
महेंद्र सपकाळ,मयुर पाटील,तुषार पारधी,
कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी आदींनी केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा