Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
मालेगाव तालुक्यातील तहसीलदार यांनी कारवाई चा आदेश दिल्यामुळे टोन क्रेशर मालकाची तक्रारदार बच्छाव याना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या मुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
मालेगाव तालुक्यातील तहसीलदार यांनी कारवाई चा आदेश दिल्यामुळे टोन क्रेशर मालकाची तक्रारदार बच्छाव याना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या मुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
मालेगाव : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा काहूर काही अंशी शमले असले तरी तालुक्यात स्टोन क्रेशर माफियांनी आपले डोके वर काढल्या मुळे तालुक्यातील शांतता भंग होते की काय ?असे भय तालुका वासियांना वाटू लागले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर नागरिक मालेगावच्या तहसीलदारांच्या कारभारावर नाराज असून त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहण्याची भूमिका नागरिकांची होते आहे. समजलेली हकीकत अशी की दरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी तीन स्टोन क्रेशर विना परवाना सुरू असल्याची तक्रार मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे दाखल केली असून त्याची दखल घेत उप विभागीय दंडाधिकारी यांनी संबंधित तक्रारदार यांना सोबत घेऊन घटनेची चौकशी करून तक्रार दाखल करण्याचा आदेश जारी केला आहे.या कामी तक्रारदार रामदास बच्छाव हे तहसीलदार यांच्याकडे गेले असता स्टोन क्रेशर माफियांनी तहसीलदारां समोरच बच्छाव यांना तोंडी ठार मारण्याची धमकी दिली. तहसीलदार यांनी बघ्याची भूमिका घेऊन मी ऐकलेच नाही अशी कसरत करून जसे काही झालेच नाही असा आव आणून स्टोन क्रेशर माफियांना कुठल्याही प्रकारे काही न म्हणता त्यांच्यावर कार्यवाही केलेली नाही त्यामुळे बच्छाव यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून स्टोन क्रेशर माफियांनी प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांसमोरच धमकीचे अश्र वापरल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून तहसीलदारांनी मी ऐकलेच नाही अशी भूमिका घेणे आणि स्टोन क्रेशर माफियांना सहीसलामत ठेवणे म्हणजे कुठेतरी पाणी मूरते अशी चर्चा तालुक्यात असून नागरिक तहसिलदारांच्या असल्या कारभारामुळे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले आहेत. तर रामदास कारभारी बच्छाव यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे कडे धाव घेतली असून मला व माझ्या कुटुंबियांच्या जिवास धोका निर्माण झाला असून मला व माझ्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन फिर्याद दाखल करण्यात यावी अशी मागणी बच्छाव यांनी लेखी अर्जाद्वारे अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्याकडे केली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...

चौकशी आदेश देण्या आधीच धमकी दिली आणि तहसीलदार या प्रकरणी सहभागी आहेत.
उत्तर द्याहटवा