Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने पाठिंबा दिल्याने ज्येष्ठ पत्रकारांच्या लढ्याला यश महासंचालक पांढरपट्टे यांच्या आश्वासनानंतर नांदेडच्या पत्रकारांचे उपोषण स्थगित
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेने पाठिंबा दिल्याने ज्येष्ठ पत्रकारांच्या लढ्याला यश महासंचालक पांढरपट्टे यांच्या आश्वासनानंतर नांदेडच्या पत्रकारांचे उपोषण स्थगित
नांदेड - आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठीचे अर्ज येत्या जानेवारी महिन्यातील बैठकीत सादर करुन घेऊन निर्णय कळविण्याचे आश्वासन राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्यानंतर चार जेष्ठ पत्रकारांनी काल नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोरचे आपले आमरण उपोषण स्थगित केले असून यासाठी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेने पाठींबा दिल्याने त्यांच्या या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेच्या पात्रतेसाठी जाणीवपूर्वक जाचक अटी लादून राज्यभरातील जेष्ठ पत्रकारांचा अवमान करण्यात येत आहे. असाच प्रकार नांदेड येथेही घडला असून जेष्ठ पत्रकार डि.पी. विष्णुपूरीकर, माधव संताजी अटकोरे, मोहम्मद सत्तार आरेफ, सौ.अनुराधा धोंडोपंत विष्णुपूरीकर या चौघांनी या योजनेसाठी स्वतःची परिपूर्ण प्रस्ताव सादर केली होती परंतू, सदरील चारही प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याऐवजी त्यात जाणीवपूर्वक त्रुटी असल्याचे सांगून वेळोवेळी माघारी पाठवतांना संबंधित विभाग असलेल्या त्रुटींचा उल्लेख टाळून त्यांना या योजनेपासून वंचित ठेवित गत दोन वर्षांपासून अपमानास्पद वागणूक देत असल्याने चौघांनीही वेळोवेळी सदरची गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली मात्र त्यांनी दखल घेतली नसल्याने जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड कार्यालयासमोर काल आमरण उपोषण सुरु केले होते.या घटनेची माहिती मिळतात अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी या बाबत लक्ष घातले तसेच, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, ‘दै.प्रजावाणी’चे संपादक शंतनू डोईफोडे, परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय जोशी, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे, महानगर कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार, किरण वाघमारे आदींनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला.त्याचबरोबर, राज्याचे मुख्यमंत्री तथा, माहिती व जनसंपर्क मंत्रालयाचे मंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणात लक्ष देण्याबाबत सविस्तर निवेदन दिले.
जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्याशीही या शिष्टमंडळाने सदरच्या न्यायीक मागणीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी या प्रकरणात राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांना संपर्क साधून त्यांच्याशी यशस्वी चर्चा घडवून आणली सोबतच,त्यांनी या चारही जेष्ठ पत्रकारांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुतोवाच करुन त्यांच्याच आदेशानुसार राज्याचे माहिती (वृत्त व जनसंपर्क) संचालक दयानंद कांबळे यांनी उपोषणार्थी चारही पत्रकारांचे प्रस्ताव येत्या जानेवारी महिण्यातील समितीच्या बैठकीत सादर करुन निर्णय कळवू असे जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड यांच्यामार्फत उपोषणार्थी यांना अवगत करावे असे आदेश लातूरच्या विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालकांना दिले त्यानुसार जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी तसे लेखी पत्र दिल्याने डि.पी.विष्णुपूरीकर, माधव अटकोरे,मोहम्मद अब्दुल सत्तार आरेफ,सौ.अनुराधा विष्णुपूरीकर या चारही जेष्ठ पत्रकारांनी त्यांच्या कार्यालयासमोरील आपले आमरण उपोषण स्थगित केले.
दरम्यान जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी सुरु केलेल्या योजनेत त्रुटींच्या नावाखाली प्रशासनाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमूळे अवमान होत असल्याने एका जेष्ठ महिला पत्रकारांसह तीन जेष्ठ पत्रकारांवर आमरण उपोषण बसण्याची वेळ आल्याने राज्यभरातील पत्रकार संतप्त झाले असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच माहिती व जनसंपर्क मंत्रालयाचाही कार्यभार असल्याने त्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष देण्याची मागणी केली आहे.
या उपोषणाला अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी सदस्य तथा ‘दै.उद्याचा मराठवाडा’चे संपादक राम शेवडीकर, प्रल्हाद उमाटे,‘दै.पुण्यनगरी’चे कालिदास जहागीरदार, सुधीर प्रधान, बजरंग शुक्ला, रविंद्र कुलकर्णी, राजकुमार कोटलवार, संघरत्न पवार, लक्ष्मीकांत पाटील, चंदन मिश्रा आदींसह नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व जिल्हाभरातील पत्रकारांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा