Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

धुळे जिल्ह्यात व शहरात प्लास्टीक पिशव्यांचा वापर सर्रास सुरूच



शासनाकडून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असली तरी हा निर्णय दीर्घकाळ न टिकल्याने अल्पावधीतच प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा सुरु झाला आहे. धुळे मध्ये देखील महानगर पालिकेने याबाबत काटेकोरपणे पालन करत कारवाई केली होती मात्र महाड मध्ये देखील प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर आणि विर्की केली जात आहे. यामुळे दैनंदिन कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे.
प्लास्टीक पिशवी हा एक अविघटनशील घटक असल्याने प्लास्टीक कचरा एक समस्या बनली आहे. प्लास्टीक पिशव्यांचे डोंगर पेटवल्यानंतर त्यातून निघणाÚया वायूमुळे मोठया प्रमाणावर प्रदुषण देखील होते. मुक्या जनावरांकडून या पिशव्या खाल्ल्या गेल्यानंतर त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर शासनाने निर्णय घेत 20 मायाक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी घातली. प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी ना पर्यावरण विभागाकडून झाली ना संबधीत विभागाकडून. यामुळे सरसकट अशा पिशव्या बाजारात पुन्हा सहजगत्या उपलब्ध होत आहेत. खाद्यपदार्थां पासून बाजारात मिळणाÚया सर्वच वस्तू विविध प्रकारच्या प्लास्टीक पिशव्यांमध्ये पॅकींग केले जाते आणि वस्तू काढून घेतल्यानंतर या पिशव्या कचरा कुंडीत जात आहेत. बाजारात छोटया विक्रत्यांपासून मोठे विक्रते देखील अशा प्रकारच्या पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत.
धुळे शहरात प्लास्टीक पिशवी बंदीचा निर्णय सन २०११ - १२ मध्ये घेतला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कांही दिवसच करण्यात आली त्यानंतर मात्र प्रत्येक दुकानात प्लास्टीक पिशवी दिसू लागली आहे. यामुळे बाजारात रिकाम्या हाताने जाणाऱ्या ग्राहकाला हातगाडी वरील फळविक्रेत्यापासून मोठया व्यापाऱ्यांपर्यंत सर्वचजण अशा प्रकारच्या पिशव्या देताना दिसत आहेत. प्लास्टीक पिशवी ही गंभीर समस्या असली तरी शासनाने नियमाच्या आड २० मायक्राॅनपेक्षा कमि जाडीच्या पिशव्यांना बंदी घालतानाच विविध वस्तू, खेळणी, कटलरी, कपडे, प्लास्टीक सामान, अशा विविध वस्तू पॅकींग करीता होत असलेल्या प्लास्टीक पिशव्यांना मात्र रान मोळेच सोडले आहे. यामुळे बाजारात प्रतिदीन मोठया प्रमाणात प्लास्टीक पिशव्यांचा कचरा तयार होत आहे. शहरातील बाजारपेठेतील गटारे, कचराकुंडया, रस्ते या पिशव्यांनी भरू लागली आहेत.धुळे व नंदुरबार या महा नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचा पालिकेलाच विसर पडल्याने प्लास्टीक कचरा शहरात मोठया प्रमाणात वाढू लागला आहे. शहरातील गटारे या प्लास्टीक पिशव्यांनी भरली गेली असल्याने सांडपाण्याचा निचरा देखील व्यवस्थीत होत नाही.त्यामुळे नागरिकांचे आरोग्यवर देखील विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध