Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र संलग्न संघटना भोईराज युवा प्रतिष्ठान,शिरपुर च्या वतीने वीर जवान यांच्या अंत्यविधीसाठी हव्या असलेल्या शासकीय जागेस विरोध केल्याप्रकरणी प्रांताधिका-यांना निवेदन..!




शिरपूर प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी या गावाच्या शहीद जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या अंत्यविधी जागेसाठी काही लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याप्रकरणी योग्य ती सखोल चौकशी त्या विरोधकांची व्हावी यासाठी आज भोईराज युवा प्रतिष्ठान,शिरपुरच्या वतीने प्रांत मॅडम यांना निवेदन देण्यात आले

यावेळी भोईसमाज युवा मंच चे जेष्ठ मार्गदर्शक श्री यशवंत निकवाडे सर,भोईराज युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दीपक सुनिल भोई,मनोज भगवाण भोई,नरेश दिलीप भोई,आनंद पाटील,मयूर सोनवणे,जगन्नाथ ढोले,भिका वाडीले, गणेश भोई ,प्रवीण भोई,विलास उखा भोई,पवन भोई भूषण भोई,जयदीप भोई,दिनेश शिवदे,स्वप्नील भोई,विकी भोई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी व योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी उपस्थितांनी केली.तसेच भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातुन सदर घटनेच्या निषेधार्थ निवदने देण्याचे सर्व पदाधिका-यांना सुचित करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध