Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

खर्दे बु.येथील माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात बोटॅनिकल गार्डन ची निर्मिती..!




तालुक्यातील खर्दे बु.येथील आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात संस्थेच्या आश्रयदात्या स्व. हेमंतबेन पटेल उर्फ मम्मीजी यांच्या जयंती निमित्ताने बोटॅनिकल गार्डन व सायंटिस्ट वॉल चे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेशजी शर्मा होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या आश्रयदात्या हेमंतबेन पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यालयात विविध प्रजातीच्या वनस्पतींचे लागवड करून निर्माण केलेल्या बोटॅनिकल गार्डन चे उदघाटन सरपंच श्रीमती सविताबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच विविध शास्त्रज्ञ व त्यांचे शोध याबाबतची माहिती असलेली  सायंटिस्ट वॉल तयार करण्यात आली असून तिचे उदघाटन माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र गुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सी. ई.ओ. यांनी विविध औषधी वनस्पतींचे महत्त्व मानवी जीवनासाठी किती महत्वपूर्ण आहे याबाबत महत्वपूर्ण विवेचन केले.
   
गावाचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून अल्प कालावधीत शालेय परिसरात झालेला सुंदर बोलका बदलांबाबत आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे यांनी केले.तसेच सुत्रसंचलन श्रीमती सीमा जाधव तर आभार ए. जे. पाटील यांनी व्यक्त केले.
  
यावेळी  संस्थेचे सी. ई. ओ. डॉ. उमेश शर्मा, सरपंच सविताबेन पटेल, उपसरपंच नितीन गुजर, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र गुजर, माजी सरपंच भरत गुजर, पोलीस पाटील सुरेश सोनवणे, प्राचार्य पी. आर. साळुंखे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव,पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी एम पवार,बी एस बडगुजर, पी एस अटकळे, बी एस पावरा, सीमा जाधव, सुनीता सुर्यवंशी, सुनंदा निकम,निकिता पाटील, सचिन पवार व ललित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध