Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

काळखेडे ग्रामपंचायत येथे उपसरपंच पोटनिवडणूक..!



प्रतिनिधी गणेश पाटील धुळे :- काळखेडे ग्रामपंचायत येथे उपसरपंच पोटनिवडणूक माननीय सरपंच डॉ प्रविण सुर्यभान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आज उपसरपंच पदासाठी सौ.लताबाई मुकुंदा  पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मा.माजी सरपंच डॉ शातांराम पाटील यांच्या प्रेरणेने आणि काँग्रेस अवजड उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष माजी खरेदी विक्री संचालक श्री रावसाहेब धर्मा पाटील यांच्या आशीर्वाद लाभला व काळखेडे ग्रामपंचायत माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील,माजी उपसरपंच चिंतामण मोरे,माजी उपसरपंच सौ.सुनंदाताई गुलाब पाटील,ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य संतोष भगवान पाटील सौ.निर्मलाताई भास्कर पाटील ग्रा.प.सद.सदस्या सौ.मनिषाताई राजेंद्र मोरे, यांच्या सहकार्याने सौ.लताबाई मुकुंदा पाटील यांची उपसरपंच पदी विराजमान झाल्या या निवडणुकीचे कामकाज मा.निवडणुक अधिकारी श्री एस.एस.बोससे सर यांनी कामकाज व मार्गदर्शन केले या सभेला श्री ज्ञानेश्वर पाटील माजी उपसरपंच व माजी ग्रामपंचायत सदस्य श्री राजु मोरे यांनी सुत्र संचालन केले. 

या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक मोतीलाल बापु श्री,दगंल सावळीराम पाटील,श्रीहिलाल सिताराम माळी श्रीदिनेश बाबुलाल पाटील,श्री भास्कर गोरख पाटील,इ.ग्रामस्थ उपस्थित होते सौ.लताबाई मुकुंदा पाटील काळखेडे गावातील प्रसिद्ध किराणा श्री मुकंदा बाबुलाल पाटील यांच्या सुविद्य पत्नी व काळखेडे व परिसरातील प्रसिद्ध कापसाचे व्यापारी श्री नितीन शेठ व कैलास शेठ यांच्या मातोश्री आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध