Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

धुळे जिल्हा शत प्रतिशत भाजपामय.. जिल्ह्यात भाजपाची घौडदड सुरूच; एका पाठोपाठ सर्वच निवडणुका जिकल्या.. भाजपाचे आमदार जयकुमारभाऊ रावल ठरले किंगमेकर..



धुळे जिल्हा हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हटला जायचा.. गांधी घराणे आणि धुळे जिल्हा यांचे निकटचा संबंध असायचा.. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही आ. जयकुमारभाऊ रावल यांच्या माध्यमातून भाजपाला धुळे जिल्ह्यात एक तरुण, उमदा, उच्चशिक्षित असे नेतृत्व लाभले आणि भाजप हा धुळे जिल्ह्यात विस्तारत गेला. शिंदखेडा मतदारसंघातील सर्वच सत्ता केंद्रावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले त्यानंतर धुळे महानगरपालिकेत अवघ्या ३ नगरसेवकांवर महापौर बसवला, जिल्हा परिषदेत सेना भाजपाची सत्ता प्रस्थापित केली. एकीकडे जिल्ह्यातील सर्वच बलाढ्य नेते कॉंग्रेसमध्ये असतानाही आ. जयभाऊंनी आपले संघटन कौशल्य आणि रणनीतीच्या जोरावर जिल्हात भगवा फडकवला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धुळे आणि नंदुरबार या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपाने आ. जयभाऊंच्या खांद्यावर टाकली दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडण्याची किमया जयभाऊंनी लिलया पार पाडली. त्यात खासदार म्हणून डॉ. सुभाषबाबा भामरे हे निवडून आले आणि त्यांच्या साथीने जिल्ह्यात भाजपा वाढवली, पुढे विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यात भाजपाने चांगली मुसंडी मारली. आ. जयभाऊंनी पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत भाजपाने त्यांना थेट कॅबीनेटमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर आ. जयभाऊ आणि खा. बाबा यांच्या साथीने धुळे महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवली. २०१९ च्या निवडणुकांदरम्यान जिल्हा नेते अमरीशभाई पटेल यांनी भाजपात प्रवेश केला आणि आ. जयकुमारभाऊंना भाजपा वाढवण्यासाठी खंबीर साथ मिळाली त्याबळावर पुढे धुळे जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता, विधानपरिषदेत भाजपाचे अमरिशभाईंचा एकतर्फी मिळवलेला विजय तदनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत भाजपाने मिळवलेली सत्ता असे करीत आ. जयभाऊ आणि आ. अमरिशभाई आणि खा. सुभाषबाबा यांच्या नेतृत्वात
धुळे जिल्हात शतप्रतिशत भाजप झाला असून आ. जयभाऊ हे किंगमेकर ठरले आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध