Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

मनसेच्या संघर्षाला अखेर यश महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याचा शासनाचा निर्णय



शिरपूर प्रतिनिधी: दिनांक १७/०१/२०२२ रोजी माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने 2014 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी राज्यभाषा व्यवसायिक व्यापारी दुकानदारांच्या मराठीत फलक असावा असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र भर राबविला होता तसेच मनसेला त्यात यश मिळाले होते पण लेट का असेना राज्य सरकारला हा नियम मान्य करावा लागला व सर्व मंत्रिमंडळाने एकमताने हा निर्णय घेतला असून मराठी भाषा फलक इतर भाषांपेक्षा ठळक अक्षराने असले पाहिजे अशी तरतूदही करण्यात आली व आता सगळ्या पळवाटा बंद झाले 
असून यात प्रशासनाने कुठलीही कुचराई करता कामा नये 

 
ही अंमलबजावणी सर्वत्र शहरापासून गावापर्यंत तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर राबविली पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून करीत आहोत व सर्व या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी जनतेस विनम्र आव्हान करतो कि सगळ्यांनी आपल्या भाषेचा आदर राखून या मातीची जाण असून, आपल्या राज्याचा अभिमान म्हणून आपल्या दुकानावर मराठी भाषा फलक हवेत. 



याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माननीय पोलीस निरीक्षक शिरपूर कार्यकारी अधिकारी नगरपालिका तहसीलदार शिरपूर यांच्याकडे निवेदन दिले आहेत त्यावेळेस उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे शिरपूर शहर अध्यक्ष चेतन राजपूत, शहर सचिव मनोज चव्हाण, रामकृष्ण ठाकूर, राकेश चौधरी राहुल शिराळे, व आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध