Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

पिंपळनेर पोलिसांची दमदार कामगिरी विदेशी मद्य वाहतूक करणाऱ्या फॉर्च्युनार करा सह तब्बल 19 लाखाचा मुद्देमाल जप्त*



पिंपळनेर :  साक्री तालुक्यातील धामंदर शिवारातील विरखेल धरणाच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मद्याचा साठा करून त्याची वाहनांतून गुजरातमध्ये तस्करी करण्यात येत होती. याबाबत पिंपळनेर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना रविवारी (ता. ३०) माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने धामंदर शिवारातील संबंधित शेडवर छापा टाकला असता तेथे फॉर्च्युनर वाहनातून होणारी मद्याची तस्करी उघडकीस आणली.
पोलिसांनी फॉर्च्युनर वाहनासह १८ लाख ८० हजार ७२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना अवैध धंदे तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याचा आदेश दिला आहे. त्याअनुषंगाने येथील पोलिस ठाण्यातर्फेही आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग तसेच तपासणी करण्यात येत आहे. येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना रविवारी (ता.३०) रात्री अकराला पोलिस ठाणे हद्दीतील धामंदर शिवारातील विरखेल धरणाच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मद्यसाठा करून त्याची वाहनांतून गुजरातमध्ये तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध