Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३१ जानेवारी, २०२२
महाराष्ट्रतील एस.टी. कामगार व कर्मचारी, संप आणि सरकार ची भूमिका
महाराष्ट्र हे चळवळीतून घडलेले राष्ट्र आहे.त्यात कष्टकरी,कामगार,शेतकरी,
शेतमजूर ते असंघटित कामगारांच्या अनेक संघटना येथे काम करतात.साहित्यरत्न,
लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे आपल्या शाहिरीत सांगतात ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नसून कामगारांच्या हाथावर आहे हेच अंतिम सत्य आहे.
त्यात मुंबई ने गिरणी कामगारांच्या आंदोलनात काय झाले हे बघितले.या महानगराच्या हृदयात अनेक कामगारांच्या वेदना,नेत्यांच्या खुनापासून ते यशस्वितेच्या कहाण्या दडल्या आहेत. असो.! कामगारांचे नेतृत्व करतांना अनेक बाबींचा सखोल अभ्यास करावा लागतो.आम्ही स्वतः मनसे माथाडी कामगार सेनेत काम केलंय.अनेक कामगार नेत्यांना जवळून अभ्यासल त्यामुळे कामगारांना हाताळताना राजकारण केलं की कामगारांचा बट्ट्याबोळ झालाच समजा.हेच नेमकं एस टी कामगार संघटनेचे बाबतीत झाले,होत आहे.
मुळात कामगार हा थोडाफारच शिक्षित असतो.आपल्या कामापूरत शिक्षण त्यांनी घेतलेले असते,बहूदा हेच चित्र असतं. त्यात एस टी. कामगारांचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील बारा बलुतेदार-अलुतेदार ह्या वर्गातील व आर्थिक मागास असलेल्या मुलांचा ह्यात ज्यास्त भरणा आहे.फक्त 15 ते 20 हजार पगारावर नौकरी करणारे हे लोक एकप्रकारे सैनिका सारखे आपले प्रवासी सुरक्षित घेऊन अहोरात्र चालत असतात.आजही गावखेड्यात ह्या वाहक- चालकांवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. राज्यात असलेल्या साधारणतः 30 च्या वरील महामंडळ पैकी एक जनतेच्या थेट संपर्कात असलेल्या या एस टी महामंडळावर सध्या शोककळा पसरली आहे,दुखवटा सुरू आहे.त्यांचे 70च्या वर (शाहिद) आत्महत्या किंवा हृदयविकार ने मृत्यू पडलेल्या कामगारांच्या दुःखात सध्या कामगार आहेत.भावाबहिणीच्या पवित्र भावबीज च्या काळात या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन राज्यभर सुरू केले.येथे जनतेची नाराजी झाली व शासनाची हाताळणी चुकली,मंत्री म्हणून अनिल परब हे अपयशी ठरले, ते आजही अपशीच आहेत.आजही दुखवट्याच्या नावाखाली आंदोलन सुरूच आहे.काय मागण्या होत्या अगदी मानवी हक्काच्या त्यांच्या 90% मागण्या होत्या.ज्या प्रमाणात ते अहोरात्र मेहनत घेत प्रवासी सेवा देतात.मात्र,त्यांच्या ताटात जर चटणी वर तेल पडत नसेल तर....त्यांच्या मुलाबाळांची भविष्य अंधकारमय दिसतं असेल तर...त्यांनी लढलंच पाहिजे हा लोकशाहीने दिलेला त्यांना अधिकार आहेच.एस.टी.महामंडळ हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे,त्यात नावीन्य काहीच नाही.संपुर्ण राज्य-देश भ्रष्टाचार रुपी राक्षसाने गिळंकृत केला आहे.परंतु, अधिकारी-मंत्री हे तुपाशी कामगार मात्र उपाशी हे किती काळ खपवून घ्यायचं हा अन्याय असह्य झाल्यावर कामगार या आंदोलनात टोकाची भूमिका घेते झाले.येथेच खरा गेम कामगारांचा सुरू झाला. एसटी महामंडळ हे खाजगीकरण करून त्यात आपली पिलावळ मालदार करायची अनेकांची मनीषा आहे.अशी स्वप्ने ते रात्रंदिवस रंगवीत असतात.ह्याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक शहराच्या हृद्यस्थानी असलेली महामंडळाच्या मालकीची जमीन होय.नागपूर, नाशिक,
औरंगाबाद, पुणे,ठाणे,मुंबई ते लहानात लहान तालुक्याच्या ठिकाणी व मोठं मोठ्या महानगरात असलेली जमीन व साधारणतः 4 कोटी प्रवासी वर्ग.असे तयार कुरण असल्यावर नियत खराब तर होणारच.त्यात अलगद अडकला तो बिचारा कामगार.त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जनतेला हे सांगितल्या जाईल संपामुळे घाटा भरून काढणे अश्यक्य आहे हेंच भविष्य आहे.लक्षात असू द्या जे आज आम्ही बोलतोय तेच घडणार आहे.माझे लाखो कामगार हे देशोधडीला लागतील हे दुर्दैवाने सांगावे लागते.वाचक मित्रांनो! कामगारांनी आपले नेतृत्व कुणाला द्यावे हे फार काळजीपूर्वक बघावे,ज्या प्रमाणे आपण मुलगी देताना सर्व गोष्टी पळताळून बघतो त्याही पेक्षा चार गोष्टी ज्यास्त नेतृतवा च्या तपासणे गरजेचे झाले आहे.अनेक कामगार नेत्यांना आम्ही विक्री होताना बघितले आहे.
मग ते संघटन कोणतेही असो.हे तर महाभयंकर आंदोलन आहे.गिरणी कामगारांच्या आंदोलनात काय झाले? त्यांच्या जमिनी किती कामगार लोकांना मिळाल्या किती भांडवलदार अरबोपती त्या जमिनीवर झाले हे वेगळं सांगायला नको.एस टी कामगारांच्या आंदोलनात गुणवंत सदावर्ते हे वकील नेतृत्व करताना दिसले.त्यांची भाषा ही भडकवणारी होती,आहे.आता वकील साहेबांच्या पुढे आम्ही लोकशाही सांगणे म्हणजे रणवीर कपूर समोर असतांना आम्ही आलिया भट वर लाईन मारण्याची हिम्मत करणे होय,तरी सुद्धा अद्यकर्तव्य.पत्रकार हा जिवंत असावा म्हणून...असो!लोकशाही
मध्ये आंदोनलन करतांना हेकड भूमिका घेऊन चालत नसतं. कोणतेही आंदोलन मागण्यांसाठी असतं त्यात प्रत्येक मागणी ही पूर्ण होत नसते काही अडचणी असतात.100 मागण्या असल्या तरी 30 मंजूर करून आपले आंदोलन काही काळकरिता थांबवून शासन-प्रशासनाला वेळ द्यावा लागतो.हीच खरी पद्धत आहे.पुढे बाकी मागण्यांसाठी लढ्याला तयार व्हावे लागते.गिरणी कामगार कसा देशोधडीला लागला हा इतिहास आम्हाला विसरता येणार नाही. एसटी कामगारांना प्रवासी संघटनेचे समर्थन का मिळाले नाही? जनता का त्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरली नाही? हे सुद्धा त्यांनी शोधावे.माझ्या लाखभर कामगारांचे घर कसे चालत असेल ह्याचा विचार केला तरी अंगावर बोटभर काटा उभा राहतो.भाड्याचे घर,गावापासून लांब नौकरी करणारी संख्या ज्यास्त नवीन शहरात ज्यास्त ओळखीचे कोणी नसतं. उधार-पधार जे लहान-सहन व्यापारी असतात ते ज्यास्त काळ चालू शकत नाहीत.
गेल्या 4 महिण्यापासून घरात पगार नाही.करोना कालखंड आधीच बेकारी वाढलेली हाताला बाहेर काम नाहीत.कसा संसार चालवत असतील त्यांच्या देवाला माहिती.ज्या दिवसाला सदाभाऊ खोत व गोपीचंद पडवळकर ह्या नेत्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला तोच योग्य होता. भरपूर प्रमाणात मागण्या मान्य झाल्या आहेत.फक्त विलीनीकरण हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने कामगारांनी कोर्टाच्या निर्णयाची वाट न बघता ज्या एसटी ने आपल्या मुलाबाळांच्या तोंडात खास टाकला ते महामंडळ खाजगीकरण होईन बरबाद होऊ देऊ नये.त्याचे पाप आपल्या अंगावर न घेता ताकतीने कामावर हजर होऊन पुन्हा नव्याने लढाईला तयार व्हावे.जनता तुमच्या सोबत राहील.या संपूर्ण आंदोलनात कोणी कोणी कसे राजकारण केले हे देशाने उघड्या डोळ्यांनी बघितले. सरकारची भूमिका चुकली,मंत्री परब अपयश घेऊन आहेत.आंदोलन हाताळता न येणे ते 4 महिने चालणे म्हणजे सरकार चुकले आहे का? हा प्रश्न साहजिकच आहे.प्रवासी जनतेचे हाल भयावह असून खाजगी वाहन लूटमार करीत आहेत.लवकर तोडगा निघाला तरंच महामंडळ वाचेल,नाहीतर उद्याचे भविष्य भयानक.
तूर्त थांबतो.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा