Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२
आदिवासी वाल्मिक लव्य सेनेच्या पदाधिकारी यांचे जिल्हाअधिकारी यांना निवेदन..!
यावल तालुक्यातील सांगवी खु!! या गावातील आदिवासी कोळी जमातीची अल्पवयीन मुलगी शौचास जात असतांना गावातीलच तीन नराधमांनी तीला ओढत नेऊन शेजारीच शेतात ओढत नेले व तीच्यावर तीन्ही नराधमांनी आळीपाळीने लैंगीक अत्याचार केला आणि घरी याची वाच्यता केली तर तिला व तीच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी पिडीत मुली्ला दीली.तरीही मोठय़ा हीमतीने पिडीत मुलीने घरी येऊन संपूर्ण आपबिती
नातेवाइकांना सागिंतली.त्यानतर नराधमांवर गुन्हा दाखल करुन त्यानां अटक कृरण्यात आली,आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली.लगेच आदिवासी वाल्मिक लव्ये सेनेच्या पदाधिकारी यांनी पिडीत मुलीच्या घरी जाऊन पिडीत मुलीची व तीच्या कुटूंबीयाची भेट घेतली व विचारपुस करून त्यानां सदर धक्यातून सावरण्याची हीमंत दिली व न्याय मीळेपर्यंत आदिवासी वाल्मिक लव्ये सेना व समाज तुमच्या पाठीसी असल्याची गव्हाई दीली.तसेच आपले.
प्रदेश अध्यक्ष मा.शाना भाऊ सोनवणे यांच्या आदेशानूसार आदिवासी वाल्मिक लव्ये सेनेच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलविण्यात आली व बैठकीत पिडीत मुलगी व तिच्या कुटूंबाला न्याय मिळत नाही तो पर्यंत त्यांच्या मागे संघटनेने खंबीरपणे उभे राहायचे असे एकमताने ठरले आणि म्हणून आज दिनांक ३१/१/२०२२ रोजी मा. जिल्हाअधिकारी सो. व मा.पोलीस अधीक्षक सो. यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.आणि निवेदन देण्यासाठी व पिडीत मुलीला न्याय मीळण्यासाठी नाशीक येथून आदिवासी वाल्मिक लव्ये सेनेच्या महीला प्रदेश कार्याअध्यक्षा मा.वैशाली ताई चव्हाण व बुलढाणा येथून गणेश भाऊ इंगळे हे आर्वजून हजर होते त्याच्या नेत्रुत्वाखाली आदिवासी वाल्मिक लव्ये सेनेच्या वतीने या पिडीत मुलीला न्याय मीळण्यासाठी मा.जिल्हाअधिकारी सो. व मा..पोलीस अधीक्षक सो.यांना निवेदन देण्यात आले.
आणि निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या..पिडीत मुलीला व तीच्या कुटूंबाला पोलीस संरक्षण मिळावे,पिडीत मुलीला नुकसान भरपाई म्हणून 50 लाखाची शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी,सदरचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी,हा खटला चालवीण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड.उज्वल निकम साहेब यांची निवड करण्यात यावी,या नराधमांना जामीन मीळणार नाही असा अहवाल तयार करुन आरोप पत्र दाखल करण्यात यावे इ.महत्व्हाच्या मागण्या करण्यात आल्या.निवेदन देतांना खालील पदाधिकारी उपस्थित हाेते.
गुलाबराव बाविस्कर, प्रदेश सचिव,प्रकाश कोळी प्रदेश उपाध्यक्ष,वैशाली ताई चव्हाण प्रदेश महीला कार्याध्यक्षा,योगेश बाविस्कर जिल्हाअध्यक्ष,सरीता ताई तायडे महीला जिल्हाअध्यक्षा,जीवन कोळी जिल्हाकार्याध्यक्षरावेर विभाग,ऍड.रमाकांत सोनवणे जिल्हाकार्याध्यक्ष जळगाव विभाग,भरत सपकाळे जिल्हाउपाध्यक्ष,
चिंतामण जैतकर वरीष्ट सल्लागार,बापू ठाकरे शहर अध्यक्ष,डॉ०पंडीत बाविस्कर जिल्हा सदस्य,अन्ना कोळीशहर उपाध्यक्ष,आत्माराम दोडे प्रदेश उपकार्याध्यक्ष,राजेन्द्र सोनवणे भुसावळ तालुका अध्यक्ष,अशोक बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष,अरुण रामदास कोळी अञावलकर इ.पदाधिकारी उपस्थित होते व इतरही पदाधिकारी आणि आजूबाजूचे खेळेगावातील समाज बांधव मोठय़ा संखेने हजर होते.आलेल्या पदाधिकारी व इतर हजर असलेले सर्व समाज बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा