Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ जानेवारी, २०२२

खर्दे विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..!



शिरपूर प्रतिनिधी :तालुक्यातील आर.सी. पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन वर्षानिमित्त शाळेतील अनाथ व गरीब असलेल्या एकूण 80 मुलामुलींना वह्या व पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
      
याप्रसंगी  शिरपूर पंचायत समिती  च्या माजी सभापती श्रीमती रंजना गुजर, सरपंच सविताबेन पटेल ,जयश्री चौधरी, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रांती जाधव, विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे यांच्या हस्ते शाळेतील गरीब , होतकरू विद्यार्थ्यांना तसेच ज्यांना आई अथवा वडील नाहीत अशा 80 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 वह्या व पेन वाटप करण्यात आले.
    
याप्रसंगी रांगोळी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.त्याचे उदघाटन पंचायत समितीच्या माजी सभापती रंजना गुजर यांनी केले.
      
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे सिनेट सदस्य व  धुळे व नंदुरबार माध्यमिक शिक्षक पतसंस्था चे संचालक अमोल सोनवणे यांच्या दातृत्वाने वह्या व पेन वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला. 
       
यावेळी प्राचार्य पी. आर . साळुंखे, पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी. एम. पवार, बी .एस. बडगुजर, पी. एस. अटकाळे, बी .एस. पावरा, सुनिता सूर्यवंशी, सीमा जाधव, सुनंदा निकम,निकिता पाटील,सुवर्णा पाटील, सचिन पवार व ललित कुलकर्णी आदि उपस्थित होते.
    
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए .जे. पाटील तर आभार प्रदर्शन सीमा जाधव यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध