Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५
Home
/
/
जळगावच्या बोगस शिक्षक प्रकरणात पुराव्यात छेडछाड नाशिकचे तत्कालीन पीआय अशोक गिरी निलंबित; पुरावे लपवून संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न...!
जळगावच्या बोगस शिक्षक प्रकरणात पुराव्यात छेडछाड नाशिकचे तत्कालीन पीआय अशोक गिरी निलंबित; पुरावे लपवून संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न...!
जळगाव प्रतिनिधी / जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांकडून बोगस शिक्षक भरती करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याच्या प्रकरणात आता पोलिस यंत्रणेतूनही धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या गुन्ह्यातील महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांचे तत्कालीन निरीक्षक अशोक गिरी यांना निलंबित करण्यात आले आहे.
बोगस शिक्षक घोटाळा : कोट्यवधींचा गैरव्यवहार
अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगरसह १० शैक्षणिक संस्थांनी बोगस शालार्थ आयडी वापरून बनावट शिक्षक दाखवले. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि पे युनिट अधीक्षक राजमोहन शर्मा यांनी मिळून आयडी व पासवर्डचा गैरवापर करून कोट्यवधींची बोगस बिले काढल्याचा प्रकार २७ मार्च २०२५ रोजी उघड झाला.
याबाबत नाशिकरोड पोलिसात गुन्हा क्र. १६४/२०२५ नोंदविण्यात आला होता.
पुरावे मागवून घेत छेडछाड
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नाईकवाडे यांच्याकडे होता. मात्र ते सुट्टीवर असताना, निरीक्षक अशोक गिरी यांनी तपासी अधिकाऱ्यांना न कळवता आणि स्टेशन डायरीत नोंद न करता या प्रकरणातील आवक-जावक रजिस्टर स्वतःच्या ताब्यात घेतले.
या रजिस्टरमधील नोंदींमध्ये फेरफार करून तीन संशयित संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर ठपका गिरी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
गोपनीय अहवालानंतर तडकाफडकी निलंबन
या प्रकाराची चौकशी झाल्यानंतर गोपनीय अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निरीक्षक अशोक गिरी यांना तडकाफडकी निलंबित केले. सध्या गिरी ठाणे येथील सरकारवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असून, निलंबन काळात त्यांना नाशिक मुख्यालयातच राहण्याचे आणि दिवसातून दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संस्थाचालकांशी गिरी यांचा संपर्क
गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील संबंधित तीन शैक्षणिक संस्थाचालकांचा गिरी यांच्याशी सतत संपर्क होता. त्यांच्या कार्यालयात झालेल्या वारंवार बैठकींचे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्स तपासात समोर येण्याची शक्यता आहे.
बोगस संस्थांची यादी
या प्रकरणातील मूळ फिर्यादीत खालील शैक्षणिक संस्थांचा उल्लेख आहे –
नूतन मराठा शिक्षण संस्था (जळगाव), भगिनी मंडळ शिक्षण संस्था (अमळनेर), शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, महात्मा फुले शिक्षण संस्था (टाकरखेडा), र.चि. पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था (वावडे), शिवाजी शिक्षण संस्था (कासोदा), सर्वोदय शिक्षण संस्था (सिंधगव्हाण), ग्रामीण विकास प्रसारक मंडळ (एरंडोल), बेलगंगा तांत्रिक महाविद्यालय (चाळीसगाव), आणि प.पु. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी सार्वजनिक संस्था (कुऱ्हा काकोडा, मुक्ताईनगर).
पुरावे वाचवण्यासाठी पोलिसांकडून फेरफार
या घोटाळ्यातील पुरावे म्हणजे शिक्षण विभागातील आवक-जावक रजिस्टर हेच महत्त्वाचे दस्तऐवज होते. हे रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात असताना फेरफार होणे अशक्य होते. मात्र, पोलिस निरीक्षकांनीच बदल करून दिल्याने संशयितांना वाचवण्याचा मार्ग मोकळा होणार होता — हीच या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब ठरली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर तालुक्यातील मौजे मूडी ,बोदर्डे बाम्हणे, शिवारात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आ...
-
जळगाव प्रतिनिधी / जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांकडून बोगस शिक्षक भरती करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याच्या प्रकरणात आता पोलिस यंत्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा