Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस कायमच,मात्र तहसीलदारा सह प्रशासन आपला खिसा भरण्यात मग्न,आणि वाळू माफिया मात्र मोकाट
साक्री तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस कायमच,मात्र तहसीलदारा सह प्रशासन आपला खिसा भरण्यात मग्न,आणि वाळू माफिया मात्र मोकाट
साक्री तालुक्यातील दात्तर्ती व धमनार येथे पांजरा नदी च्या लगत असलेल्या अक्कलपाडा धरणाचे पाणी येत असल्यामुळे वाळू माफियांची नजर आता तिथे लागून आहे.ज्या ठिकाणाहून अवैद्य वाळू उत्खनन व उपसा मोठ्या प्रमाणावर केला गेल्यामुळे या नाल्याची पार दुरावस्था झालेली आहे.तसेच नदी काठच्या शेतकऱ्यांच्या पाईप लाईन चे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहावयास मिळते.दात्तर्ती व धमणार येथे नाल्याला लागून असलेले गट क्रमांक 289/1/2 व 289/6/7 मध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास काही वाळूमाफिया वाळू भरून डंपरने नाशिक जिल्ह्यामध्ये पोहोचवली जाते.मालेगाव,सटाणा,देवळा, कळवण,नाशिक,या ठिकाणी मध्यरात्री डंपर पाठवले जात असल्याने शेतकऱ्यांनी वाळू माफियांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी व मारहाण करण्यात येते.याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा महसूल विभागाला निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल आज तोवर घेतली गेलेली नाही. नदी काठचा रस्त्यास मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना आपला माल वाहून नेण्यासाठी व शेतात ये जा करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. व त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान मंगळवारी सकाळी 11 वाजता साक्री महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, परंतु या वेळी कुठलाही पंचनामा केला नाही.आणि वाळू माफिया चे समर्थन केले, यामुळे असे निदर्शनास येते की वाळू माफिया आनि प्रशासन यांच्यात साठे लोटे असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही.
असा आरोप या पथकावर तेथील शेतकऱ्यांनी केला आहे. या पथकात म्हसदी चे तलाठी श्री गोडगे व म्हसदी चे सर्कल उदयसिंग पावरा यांचा समावेश असल्या चे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
यावेळी माजी सरपंच वसमार चे व्यंकट नेरे,प्रवीण सोनवणे, पंकज भामरे,लक्ष्मण माळी, दीपक सोनवणे, विजय पवार,प्रकाश सोनवणे,मिलिंद सोनवणे,प्रभाकर सोनवणे, सुनील सोनवणे, यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते
AVB माझा न्युज चॅनल सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर-तालुक्य...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा