Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. ओमिक्रोनचे रुग्ण देखील वाढत आहेत. रुग्णाकनही वाढती आकडेवारी ही चिंता निर्माण करणारी आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. ओमिक्रोनचे रुग्ण देखील वाढत आहेत. रुग्णाकनही वाढती आकडेवारी ही चिंता निर्माण करणारी आहे.
बातमीपत्र दि, 04 जानेवारी 2022 :–
महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. ओमिक्रोनचे रुग्ण देखील वाढत आहेत. रुग्णाकनही वाढती आकडेवारी ही चिंता निर्माण करणारी आहे.
आता या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य पातळीवर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार आहे, आणि हे निर्णय केव्हा घेतले जाणार आहेत, याची माहिती दिली.
पुण्यात अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत उद्या राज्यातील मंत्र्यांची बैठक होणार आहे.
सकाळी 9 वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीत राज्यपातळीवर काय निर्बंध आणि नियमावली जारी करायची, याबाबचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत होणाऱ्या या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.उद्याच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आता लागून राहील आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मात्र अजूनही म्हणावी तशी गर्दी कमी होत नसल्यामुळे आता बुधवारी होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात काही निर्बंध लागू आहेत. आता मुंबई, पुण्यातील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.
परंतु आता अजून काही जास्त उपाययोजना करण्यात येतील असे चित्र आहे. उद्याच्या बैठकीत हे चित्र क्लिअर होणार आहे.
कोरोनाची स्थिती पाहता निर्बंध आणखी कडक होऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर तालुक्यातील मौजे मूडी ,बोदर्डे बाम्हणे, शिवारात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आ...
-
शिरपूर प्रतिनिधी : शहरातील मुख्य व्यापारी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएमची यंत्रणा फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा