Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी...

  जामखेड (राहूल शिंदे)दि.12 येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
  नगरपालिका मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते  यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
  यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कष्टाचे महत्त्व सांगितले.त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा करताना येणाऱ्या अडचणी वर मात करण्याचे उपाय ही सांगितले.
  कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक प्रा.सोमनाथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार शिंदे बी.एस यांनी मानले.यावेळी मयुर भोसले ही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाऊसाहेब देवकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध