Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

युपीत मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून कळतंय सरकारवर विश्वास नाही, उत्तर प्रदेशबाबत खा.सुप्रियाताई सुळेंचं मोठं वक्तव्य.....



उत्तर प्रदेशमध्ये आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे. अशी टीका राष्ट्रवादी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
पाच राज्यात सध्या निवडणुकांचे बिगूल वाजल्याने सर्वांच्या नजरा या पाच राज्यावर लागल्या आहेत, अशावेळी उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींवरून विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशातील राजकारण देशात चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमध्ये  आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे. अशी टीका  खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे. नेताजी, अखिलेश यादव, जयंत चौधरी यांचे आभार मानते. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी ज्याप्रकारे लढत आहेत, हे खूप समाधानकारक आहे. नक्की बदल होईल. ज्याप्रकारे केंद्र सरकार निर्णय घेत आहे, एलआयसी असो, जीएसटी कलेक्शन असो हे गंभीर आहे. विरोधकांना देखील यांनी विचारात घ्यायला हवं, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत...
आमचं सरकार लोकशाहीला धरून आहे. त्यामुळे प्रत्येकाला मनमोकळेपणे बोलण्याचा आणि संवाद साधण्याचा इथं अधिकार आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी असं बोलणं हे योग्य नाही, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांना सुप्रियाताई सुळे यांनी दिले आहे. तसेच ओबीसीच्या इंपेरिकल डेटासाठी पंतप्रधान यांना मुख्यमंत्री यांनी अनेकवेळा पत्र लिहिलं आहे. परंतु तरीदेखील त्यांच्याकडून कोर्टात एक आणि संसदेत एक अशी ओबीसी इंपेरिकल डेटाबाबत माहिती दिली जाते, त्यामुळे कुठं तरी भाजप मधील ओबीसींमध्ये खदखद आहे. अशी टीकाही ताईंनी केली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध