Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३१ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
अमळनेरच्या कष्टकरी हमाल मापाड्यांची अल्पशी मदत कर्करोगाशी झुंजणाऱ्या पत्रकाराला लाख मोलाची ठरली
अमळनेरच्या कष्टकरी हमाल मापाड्यांची अल्पशी मदत कर्करोगाशी झुंजणाऱ्या पत्रकाराला लाख मोलाची ठरली
संत सखाराम महाराज यांची भूमी , पू . साने गुरूजी, श्रीमंत प्रताप शेट यांची कर्मभूमी असलेले अमळनेर गावातील अमळनेर तालुका हमाल मापाडी संघटनेचे नूतन अध्यक्ष रमेशदेव बुधा धनगर यांनी वृतपत्र व समाज माध्यमावरून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या नागपूर येथील तरुण पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष योगेश कोरडे यांना आर्थिक मदत करावी यासाठी मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख आणि अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे आवाहन वाचले व फोन करून शंभर रूपये जमा करतो असे म्हणाले. अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी रमेश देव यांना सांगितले तुम्ही एकटे नका देऊ. दहा हमाल बांधवांकडून प्रत्येकी दहा रुपये जमा करून पाठवा. त्यांनी तसेच केले आणि दहा जणांसोबतचा फोटोही पाठवला . या श्रमिक कष्टकरी बांधवांचे शंभर रूपये लाख मोलाचे आणि पत्रकार मित्र योगेश यांची प्रकृती सुधारण्यासाठी नक्कीच बळ देणारे ठरेल . धन्यवाद रमेश देव आणि त्यांचे सहकारी. या अमळनेरच्या कष्टकरी हमाल बांधवांनी केलेल्या मदतीचा समाज माध्यम व वृत्तपत्रातील वृत्ताचा परिणाम असा झाला की, खान्देशातील बऱ्याच दात्यांचे हात यथाशक्ती मदतीसाठी पुढे सरसावले.
तरुन गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा