Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३१ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
प्रशासनात अजुन किती भ्रष्ट्र आय.ए.एस.खोडवेकर सारखे अधिकारी लपलेले आहेत ते शासनाने शोधावेत व त्यांना घरचा रस्ता दाखवावा ?
प्रशासनात अजुन किती भ्रष्ट्र आय.ए.एस.खोडवेकर सारखे अधिकारी लपलेले आहेत ते शासनाने शोधावेत व त्यांना घरचा रस्ता दाखवावा ?
धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्हे व राज्यभरातच शिक्षण विभागाची लक्तरे चांगलीच वेशीवर टांगली गेली आहेत. आता पर्यंत परिक्षा मंडळ अध्यक्ष पासून थेट गावच्या एजंट पर्यंत टीईटी परीक्षा , आरोग्य ' म्हाडा , वगैरेंमधील हजारो बोगस उमेदवारांची निवड आणि अक्षरश: कोट्यवधिंचा घोटाळा गाजत आहे.वाजत आहे.
या सर्वांवर चिंताजनक कहर झाला तो या प्रकरणात चक्क एका आय ए एस अधिकाऱ्यास अटक झाली तेव्हा ! आपल्या एकूण सिस्टिमवर व एकूणच प्रशासकीय यंत्रणेवर हे प्रश्नचिन्ह आहे . या प्रकरणाने आता एकूणच नागरी सेवा सिस्टिम बाबतच पुनर्विचार करावयाची वेळ आणली आहे.
हजारो पात्र शिक्षकांवर अन्याय करून अपात्र शिक्षक उमेदवारांना सरळ पात्र म्हणून प्रमाणपत्रे देवून कोट्यवधि रुपये कमावण्यासाठी आपण आपल्या आय ए एस या देशातील सर्वोच्च मानाच्या डिग्रीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहोत.याबद्दल थोडीतरी शरम या आय ए एस अधिकार्यास वाटली नसेल काय ? कोट्यवधिच्या या टीईटी घोटाळ्यात तपासी यंत्रणा पुण्याचे सायबर सेलने परवा ठाणे येथून राज्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर याला बेड्या ठोकल्या.खोडवेकर याचा ब्लॅक लिस्टेड जी ए सॉफ्टवेअर कंपनीला ब्लॅक लिस्ट मधुन काढून पुन्हा काम देण्यात सहभाग आढळला.खोडवेकर याने आर्थिक व्यवहार करून आयुक्त सुपेकडून अनेक उमेदवारांना उतीर्ण करवून घेतले . शिक्षण विभागाचा सल्लागार अभिजीत सावरीकर याच्या कडून मोठी रक्कम खोडवेकर याने घेतली असल्याचेही समोर आले आहे.खोडवेकर हा आय ए एस आहे.
प्रचंड मेहनत व अत्यंत कठोर अशा मुलाखती मधुन तावून सुलाखून असे आय ए एस अधिकारी निवडले जातात.आता या खोडवेकर ची अॅप्टीट्यूड टेस्ट घेणारे , मुलाखत घेवून त्यास लायक ठरविणार्या सिस्टिमवर व मुलाखत कर्त्यांवरही पहिले प्रश्नचिन्ह लागणार आहे.बिटिशांच्या काळात ही इंडियन सिव्हिल सर्व्हिस होती.
तिच आपण इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणून स्वीकारली.या सेवेतील अधिकाऱ्यांनी कठोरपणे कायदे व नियमांचे पालन करत आपली सेवा बजवावी.कुठल्याही राजकीय व इतर दबावांना बळी न पडता प्रामाणिकपणे त्यांना काम करता यावे,प्रशासन गुणवतेच्या आधारावर चालविता यावे, यासाठी या आय ए एस केडरला प्रचंड सोयी सुविधा प्रोटेक्शन व आर्थिक मोबदला दिला जातो.
या केडरची शान म्हणून आजपर्यंत अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वाचे अधिकारी होवून गेले.अगदी ठामपणे पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्र्यांनाही ' हे काम नियमात बसत नाही'असे ठासून सांगणारे आय ए एस अधिकारी होवून गेले आहेत.अशा कठोर आय ए एस अधिकार्यांशी मग राजकारणीही दचकूनच राहतात व सन्मानाने बोलतात.मात्र याच राजकारण्यांच्या भ्रष्ट्राचारात किंवा विभागातील अधिकार्यांच्या भ्रष्ट्राचारात हे आय ए एस अधिकारी हिस्सा पाडू लागले तर मग या आय एस पदवीची प्रतिष्ठा , दरारा,सन्मान पार धुळीस मिळतो.पूर्वी सामान्य माणसाने एखाद्या सरकारी कर्मचारी,अधिकारी यांच्या भ्रष्टूचाराबाबत चार ओळींची तक्रार केली तर अख्खी यंत्रणा हलून जात असे.आता पुराव्यासह कितीही तक्रारी केल्या.कितीही पाठपुरावा केला तरी कारवाई कां होत नाही ? असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो.त्याचे कारण काय ? त्याचे कारण हे आहे.
खालपासून वर पर्यंत यंत्रणा सडली आहे.
थोडी फार अपेक्षा आय ए एस केडर कडून असते. पण आता या आय ए एस केडरवरही प्रश्न चिन्हे लागत आहेत. अर्थात् बऱ्याच आय ए एस अधिकार्यांच्या बाबतीत त्या त्या विभागात दबक्या आवाजात चर्चा असते.पण कुणी ते रेकॉर्डवर आणत नाहीत.कारण या केडरच्या पाठीशी असणारे जबरदस्त अधिकारांचे पाठबळ.परवा पकडला गेलेला आय ए एस खोडवेकर इतकी वर्षे कां पकडला गेला नाही ? त्याचे कारणच हे आहे.
आता टीईटी घोटाळ्याची प्रचंड व्याप्ती पाहता व अतिच झालेले समोर आल्याने हा खोडवेकर पकडला गेला. प्रशासनात अजुन असे किती आय ए एस झालेले खोडवेकर आहेत ? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? राज्याचे निवृत्त मुख्य सचिव सिताराम कुंटे सध्या कारागृहातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या इडी चौकशी प्रकरणात नुकतेच इडीला जबाब देवून आलेत.सिताराम कुंटे हे कर्तव्य कठोर व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. सिताराम कुंटे हे धुळ्यात प्रांताधिकारी व नंतर कलेक्टर म्हणून कर्तव्यावर होते.
त्यांचा कार्यकाळ व कामकाज आम्ही अत्यंत जवळून बघितले आहे. त्यांच्याशी तेव्हा बऱ्याच वेळा बऱ्याच विषयांवर चर्चा केल्या आहेत.त्यांचा धुळ्यातला कार्यकाळ तळपता कार्यकाळ म्हणून ओळखला जातो. रॉकेल पिणाऱ्या या शहरात त्यांच्या कर्तव्य कठोर पणामुळे ऑईल माफिया सळो की पळो झाले होते.अक्षरशः गटारीतून रॉकेल वाहायला लागले होते . त्यांची शिरपूर डेअरिंग तर खूप गाजली होती.
त्या काळात असे आय ए एस अधिकारी आय ए एस केडरची शान वाढवित होते . आज काय स्थिती आहे ? मंत्रालयातले प्रशासनातले एजंट,दलाल शिवाय मंत्री म्हणेल,पालकमंत्री म्हणेल त्यास " हो शी हो करणारे होयबा ! "अशी प्रतिमा बर्याच आय ए एस अधिकर्यांनी निर्माण करून टाकली आहे. खरा व स्वच्छ आय ए एस असा होयबा असू नये ! युपीएससी परीक्षा व आय ए एस केडर निर्माण करण्या मागचा घटना कारांचा हेतू स्पष्ट होता.त्या हेतूलाच हे काही भ्रष्ट्र आय ए एस छेद लावत आहेत. कुठे नेवून ठेवणार आहेत हे असे आय ए एस; प्रशासन देशाचे ?
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा