Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ८ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
जळगावचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यास मिळणार अत्याधुनीक जमीन मोजणी उपकरणे- गुलाबराव पाटील. ! १ कोटी २० लाख रूपयांची तरतूद : भूमि अभिलेखसह शेतकर्यांना होणार लाभ !
जळगावचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यास मिळणार अत्याधुनीक जमीन मोजणी उपकरणे- गुलाबराव पाटील. ! १ कोटी २० लाख रूपयांची तरतूद : भूमि अभिलेखसह शेतकर्यांना होणार लाभ !
जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणार्या अडचणी, आणि भूमि अभिलेख कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात होणारी अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यासाठी १२ आधुनीक जमीन मोजणी यंत्रे भूमि अभिलेख कार्यालयास मिळणार असून यासाठी १ कोटी २० लाख ६१ हजार ३० रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून रोवर मशिन युनिट प्रणाली यांचा समावेश आहे. याचा भूमि अभिलेख विभाग आणि शेतकर्यांना लाभ होणार असून याच्याच मदतीने जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणार्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील अधिक जलद गतीने होणार आहे उर्वरित ईटीएस मशिन आणि प्लॉटर साठी 70 लाखाची तरतूदही पुढील काळात करण्यात येणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले
या संदर्भात वृत्त असे की, भूमि अभिलेख कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व जमीनींच्या अभिलेख्यांचे जतन करण्यासह नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या जमीनींचे मापन करण्यात येते. यात हद्दी निश्चीत केल्यानंतर बिनशेती, ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख तयार केले जातात. आजवर या सर्व प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरीक पध्दतीत पार पाडल्या जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तर लागतेच पण अनेक ठिकाणी झाडी-झुडपी, डोंगर-दर्या आदींमुळे जमीन मोजणीत मोठ्या अडचणी येतात. या अनुषंगाने जिल्हा भूमि अभिलेख विभागाला जमीन मोजणीसाठी अद्ययावत उपकरणे मिळावीत अशी मागणी संबंधीत खात्यातर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. या संदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत १ कोटी २० लाख ६१ हजार ३० रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. मागणी नुसार ईटीएस मशिन आणि प्लॉटर साठीही तरतूद करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला एक असे १५ भूमि अभिलेख कार्यालये आणि एक नगर भूमापन असे १६ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या आधुनीकीकरणासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत जीआयएस प्रणालीचा वापर करून रोवर मशिनच्या मदतीने भूमि अभिलेख कार्यालयाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असणारे जिल्ह्यात चार कॉर्स स्टेशन्स असून ते अनुक्रमे शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, जळगाव; प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर तालुका जामनेर; सार्वजनीक बांधकाम खाते कार्यालय अमळनेर आणि सार्वजनीक बांधकाम खाते कार्यालय भडगाव येथे स्थापित करण्यात आलेली आहे. याच्याशी कनेक्ट असणार्या १२ रोवर मशिन्स या निधीतून खरेदी करण्यात येणार आहेत. याचे करांसहीत मूल्य १ कोटी २० लाख, ३६ हजार रूपये इतके आहे.
भूमि अभिलेख कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व मालमत्तांचे ड्रोनच्या सहाय्याने मापन सुरू असून जीआयएस, कॉर्स, रोव्हर आणि ईटीएस या प्रणालींच्या मदतीने या विभागातील कामाला प्रचंड गती मिळणार आहे. याचा साहजीकच जनतेसह या विभागाला लाभ होणार आहे. तर महत्वाचे म्हणजे महामार्गांसह विविध शासकीय उपक्रमांसाठी भूमि अधिग्रहण करण्यासाठी ही यंत्रणा अतिशय उपयोगी ठरणार आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनि...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा