Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

आदरणीय शरद पवारसाहेब यांना करोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील त्यांच्या समर्थकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे



 सोशल मीडियासह अन्य माध्यमातून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.  या पार्श्वभूमीवर शरद पवारसाहेब यांचे नातू आ.रोहितदादा पवार यांचं एक ट्वीट लक्षवेधक ठरत आहे.
अलीकडेच रोहितदादा पवार यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले आहेत. आज सकाळी ज्येष्ठ नेते पवार यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी स्वत:च ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर आमदार रोहितदादा पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आ.रोहितदादा पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, ‘आजोबा, एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या ट्वीटने सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. पण मला माहीत आहे, योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत.
दरम्यान, आतापर्यंत अनेक आजारपणांना सामोरे गेलेल्या शरद पवारसाहेब यांच्या खंबीरपणाची नेहमीच चर्चा होत असते. आजारातून सावरताच राज्याच्या दौरा करून आपण ठणठणीत असल्याचा संदेशही ते देतात. त्यांच्या गुणवैशिष्ट्याची नेहमी चर्चा होत असते. आ. रोहितदादा हेही अनेकदा त्यांचे अनुकरण करीत असल्याची चर्चा होते. करोनातून बरे होताच रोहितदादा पवार यांनीही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागाचा दौरा केला आहे. त्यानंतर खुद्द शरद पवारसाहेब यांनाच करोनाचा संसर्ग झाल्याचं कळाल्यानंतर रोहितदादा पवार भावुक झाल्याचं दिसून आलं आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध