Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

शिरपूर तालुक्यात अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त पिक व घरांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई तात्काळ द्यावी - आ. काशिराम पावरा


   
शिरपूर : शिरपूर शहर व तालुक्यात सर्वत्र दि.७ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ७ वाजेच्या दरम्यान झालेल्या गारपिठ, वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याने संपूर्ण शिरपूर तालुक्यात मोठया प्रमाणात फळपिकांचे, कांदा,हरभरा,गहु,राहाते घरे, पशुधन इत्यादी रब्बी हंगामाच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होवुन शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. वरुण राजाने शिरपूर तालुक्यातील बळीराजावर अवकृपा केली आहे. तरी शिरपूर तालुक्यात अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त पिक व घरांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणीचे निवेदन आ. काशिराम पावरा यांनी नायब तहसिलदार शिरपूर यांना (दि.८जानेवारी) रोजी सकाळी १२ वाजेला दिले आहे. 

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष के.डी. पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील,मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, शिसाका संचालक भरत पाटील,शिरपूर कृउबा समिती संचालक अॅड. प्रताप पाटील, शिसाका माजी संचालक जयवंत पाटील, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे आदि उपस्थित होते. निवेदनित म्हटले आहे की, शेतकरी बांधव व तालुक्यातील जनता पावसा मुळे व गारपिटीमुळे उदास झाली आहे. शेतकरी बांधवांची पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत.तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे पिके हातातून गेली आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला बळीराजा हा पुन्हा मोठया आर्थिक संकटात सापडलेला आहे. निसर्गाने गेल्या काही वर्षांपासून बळीराजावर सातत्याने अवकृपा केली आहे. कधी गारपीट,तर कधी अवकाळी पाऊस निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले असून शेतकरी राजा हा शेती व पिकां प्रमाणेच पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. 

शेती करणे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांना परवडणारी राहिली नाही. या गारपिटमुळे झालेल्या नुकसानीचे फळपिक व रब्बी हंगामाचे महसुल विभाग, कृषिविभाग तसेच विमा कंपनी यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश होवुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास तात्काळ देण्यात यावे अशी अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध