Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

पिंपळनेर पोलिसांची दमदार कामगिरी एक अज्ञात कार मध्ये देशी विदेशी कंपनीच्या मद्यासह 5 लाख पेक्षा अधिकचा मुद्देमाल सह एक गावठी कट्टा हस्तगत



पिंपळनेर - पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका वाहनावर कारवाई करण्यात आली असून त्यात देशी विदेशी कंपन्यांच्या मध्ये सह गावठी कट्टा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मा. पोलीस अधीक्षक धुळे, श्री. प्रविणकुमार पाटील यांनी गुन्हे बैठकी दरम्यान राज्य व जिल्हा बॉर्डर पॉईंटवर अचानक नाकाबंदी करुन अवैध मद्य तस्करी तसेच अग्निशस्त्र कारवाई करणे संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्या नुसार दिनांक ०८/०१/२०२२ रोजी ०३.०० वा. पासुन सपोनि / सचिन | साळुंखे, पोउनि / प्रदिप सोनवणे असे स्टापसह नवापुर ते पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ गावाजवळ नाकाबंदी करीत असतांना नवापुर कडुन पिंपळनेरकडे येणारी कार स्विप्ट कार क्रमांक जी.जे. ०२.ओ.सी. ४०४३ यावरील वाहन चालक यास थांबण्याचा इशारा दिला असता त्याने स्वतःचे ताब्यातील वाहन जागीच सोडुन पळुन गेला सदर वाहनाची तपासणी केली असता गावठी बनावटीचा कट्टा व देशी विदेशी कंपनीचा अवैध मद्य साठा मिळुन आला.या कारवाईत ५,००,०००/- रु. एक पांढ-या रंगाची मारुती कंपनीची स्विप्ट कार क्रमांक जी.जे.०२.सी. ४०४३ ,जु.वा. कि.सु. ५८,५६०/- रु. इम्पलेरियल ब्ल्यु कंपनीची विदेशी दारु, टँगो पंच देशी दारु व हायवर्ड ५००० बिअरचे डब्बे,२५,०००/-रु. एक काळया रंगाचा गावठी बनावटीचा कट्टा त्यास ६ इंच लांबीचे बरेल, ५ इंच लाबीची मुठ त्यावर लाकडी कव्हर असलेले व ४ इंच लांबीचे २ मॅक्झिमन असा एकूण ५,८३,५६०/- रु. किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वाहनाचे चालक व मालक यांनी आपसात संगणमत करुन चालकाने स्वतःच्या ताब्यात अवैधरित्या गावठी बनावटीचा कट्टा बाळगुन वरील वर्णनाचा अवैध मद्य साठा वाहतुक करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगुन वाहतुक करीत असतांना पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला आहे. सदर बाबत चालक व मालक यांचे विरुध्द पोना / दत्तु कोळी यांनी सरकार वतीने | फिर्यादी होऊन फिर्याद दिली असून त्याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनला भाग ६ गुरनं ०४ / २०२२ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि प्रदिप सोनवणे करीत आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत बच्छाव,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रदिप मैराळे,स्था.गु.शा.पो.नि.श्री. शिवाजी बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक सचिन साळुंखे, पोउनि / प्रदिप सोनवणे, पोना/दत्तु, कोळी, पोना/ हेमंत सोनवणे, पोना/ जयकुमार, सोनवणे पोना/ विशाल मोहने,पोशि/ सोमनाथ पाटील, पोशि/रविंद्र सुर्यवंशी,पोशि/ नरेंद्र परेदशी यांनी केली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध