Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

राज्यात काल पासून चार दिवस पाऊस..!विदर्भात गारपीट..! शिरपूर व शिदखेडा तालुक्यात बेमोसमी पावसाची हजेरी..!




राज्यात काल पासून चार दिवस पाऊस..!विदर्भात गारपीट..! शिरपूर व शिदखेडा तालुक्यात बेमोसमी पावसाची हजेरी..! मुंबई राज्यात 7 ते 10 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसू शकतो.तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याची हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाचे के एस होसलीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय .7 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळं बुलडाणा,अकोला, अमरावती,वर्धा,नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अ‌लर्ट देण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला अमरावती,वाशिम, यवतमाळ,वर्धा,नागपूर,चंद्रपूर,भंडारा, गोंदिया,गडचिरोली जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.काल संध्याकाळी शिरपूर व शिदखेडा तालुक्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली.या अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तसेच विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध