Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

राज्यातील नगरपंचायतीसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करा =शिवसेनेची मागणी..! नगर विकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन..!



शिंदखेडा {प्रतिनिधी} राज्यातील नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्यासाठी राज्य शासनाने महानगरपालिका नगर परिषदांमधील निर्वाचीत सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु नगरपंचायतीसाठी अधिनियमात बदल करून बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू झालेली नाही त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतर झालेल्या नगरपंचायती साठी देखील बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करावी अशी मागणी राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे शिंदखेडा तालुका समन्वयक विनायक पवार यांनी केली आहे.
 
याबाबत नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या नुसार राज्यातील नगरपंचायत साठी बहुसदस्यीय प्रभाग बदलून मागील शासनाने एक सदस्य पद्धत केली होती नगरपंचायत मध्ये एक सदस्य प्रभागात मतदारांची मतदार संख्या मर्यादित होत असल्याने प्रभाग अतिशय लहान होतात त्यामुळे अशा प्रभागात निवडणुकींचा घोडा बाजार चालतो,!धनशक्ती !असलेला उमेदवार आपल्या पैसा व प्रभावाचा वापर करून विजयी होतो असे सर्व ज्ञात आहे,त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण ग्रामपंचायतींच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर नगरपंचायतीचे रुपांतर होत असल्याने नगरपंचायतीचे नव्यानेच शहरी भागात निर्माण झालेल्या नागरी भागांचे विकास करण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत पुन्हा अवलंबविण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.
 
सद्यस्थितीत 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर राज्यातील नगर परिषदांची सदस्य संख्या निर्धारित आहे त्यात महानगरपालिका मध्ये सदस्य संख्या वाढवण्यात आले असतानाच काही नगरपालिका व नगरपंचायत यांना देखील हे नियम लागू करावे यासह दोन वर्षापासून
 कोबीड- 19 च्या प्रादुर्भावामुळे 20 21 च्या जनगणनेच्या निष्कर्ष तयार नसल्याचे समजते,परिणामी शहराची लोकसंख्या वाढलेली असताना या लोकसंख्या वाढीचा सरकारी वेग गृहीत धरून नगरपालिकांची सदस्य संख्या 17 टक्के वाढवण्यात आली आहे हाच नियम नगरपंचायती साठी देखील लागू करावा व नगरपंचायत व नगरपालिका अधिनियमात नमूद केल्यानुसार बदल करून ग्रामीण नगरपंचायती साठी विकासाची दारे खुली करण्यात यावी व एक सदस्यीय प्रभाग पद्धत बदलून बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिदखेडा तालुका समन्वयक विनायक पवार यांनी नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध