Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ जानेवारी, २०२२



तरुण गर्जना वृत्तसेवा शिरपूर प्रतिनिधी शिरपूर शहरातील मच्छीबाजार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने नविन ताडी विक्री दुकानास परवानगी दिलेली आहे व त्या ठिकाणी सदर परवाना धारक यांनी दुकान सुरु करण्याचे सर्वोतोपरी हालचल सुरु केलेली असल्याने परिसरातील महिलांनी अंत्यत जागरूकपणे भविष्याचा वेध घेत सदर दुकानास विरोध दर्शविलेला आहे. 

व त्याबाबत त्यांनी तहसिलदार शिरपूर व राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे जवळपास ६० ते ७० रहिवाश्यांच्या नाव व सह्यानिशी लेखी तक्रार अर्ज सादर केलेला आहे . त्यांच्या अर्जानुसार आमच्या परिसरात ताडी विक्री करण्यास परवाना देतांना आमच्याकडून कोणतीही नाहरकत घेतलेली नाही.अथवा तशी कोणतीही विचारणा आम्हांस केलेली नाही. 

तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषदेकडून देखील तशी परवानगी घेतलेली नसल्याचे न.पा.अधिकारी यांनी माहिती दिली . मच्छीबाजार परिसरातील रहिवाश्यांमध्ये अतिशय गोर - गरीब जनतेचा समावेश आहे सदर तक्रारी अर्जानुसार शासनाच्या या नवीन ताडी विक्री दुकानाच्या परवानगीमुळे भविष्यात मच्छीबाजार परिसरातील कर्ते पुरुषांना ही वाईट सवय लागू शकते.व किती तरी आई बहिणींचा कुटुंब उध्दवस्त होऊ शकते.तसेच या ठिकाणी ताडी पिण्यासाठी येणाऱ्यांकडून ताडी प्राशन केल्याच्या नशेत परिसरात अनुचित प्रकार घडू शकतो.अशी कळकळीची व भविष्यातील वेध घेणान्या महिलांनी व नागरिकांनी तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. 

तरी देखील सदर परवाना रद्द न केल्यास व परिसरात कोणताही तसा अनुचित प्रकार घडल्यास त्यास परवाना देणारे शासन प्रतिनिधीस जबाबदार धरू असे देखील अर्जात म्हटलेले आहे . याबाबत काल दि . ३ रोजी धुळे येथील राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात संबंधीत रहिवासींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तक्रारी जिल्हा कार्यालयास सादर केलेला आहे. 

सदर अर्जावर नक्कीच कारवाई होईल अशी आशा तक्रारदारांनी जनतेच्या प्रती प्रमाणिकपणे काम करणाऱ्या अधिकान्यांविषयी बाळगुन आहे...या परीसरातील जवळपास ७० ते ८० टक्के रहिवासी महिलांनी मच्छीबाजार परिसरातील नवीन ताडी विक्री दुकानास
गर्जना विरोध केलेला आहे. 

तरी शासनाच्या दारू बंदी कायद्यांतील तरतुदीनुसार परिसरातील रहिवासी महिलांनी व रहिवासी नागरीकांनी केलेल्या विरोधानुसार सदरील मच्छीबाजार परिसरातील नवीन ताडी विक्री दुकान परवाना आपण तात्काळ रद्द करावा.ही समस्त मच्छीबाजार परीसरातील रहिवासी नागरीक व रहिवासी महिला यांच्या वतीने कळकळीची विनंती अर्जासह तक्रार अर्ज तहसिलदार शिरपूर व राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे दाखल केलेला आहे. 

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी संबंधीत रहिवासी महिलांनी अर्जाची प्रत यापूर्वीच दिलेली असून यात सौ. ताराबाई ठाकूर,छाया पाटील,रजिया तेली,सुलताना मेहतर , फेमिदा मेहतर रशिदा मेहतर,नजमा लोहार , शबाना मेहतर,फातिमा तेली,वहिदा तेली , जाकिर तेली,अरबाज मन्सुरी,( पान ३ वर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध