Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

करवंद नाक्यावरील दोंडाईचा येथील तरुणाच्या खिशातील मोबाईल व रोकड हिसकावल्या प्रकरणी तीन वर्षांपासून फरार आरोपीस सुरत येथून गोपनीय माहितीवरून ताब्यात



करवंद नाक्यावरील दोंडाईचा येथील तरुणाच्या खिशातील मोबाईल व रोकड हिसकावल्या प्रकरणी तीन वर्षांपासून फरार आरोपीस सुरत येथून गोपनीय माहितीवरून ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी हजर केल्याची उत्कृष्ट कामगिरी शहर पोलीसांच्या शोध पथकाने बुधवारी केली आहे.मुकेश सुदाम बाविस्कर वय ३२ रा.उंटावद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
     
तालुक्यातील उंटावद येथील संशयित मुकेश बाविस्कर व वरवाडेचा योगेश उर्फ महेश वसंत कोळी यांनी दोंडाईचा येथील रहिवासी दिलीपसिंग गोराखसिंग राजपूत याच्याकडून शिरपूर शहरातील करवंद नाक्यावरील छोटू कोल्हापूरी वडापाव दुकानजवळ 29 जून 2018 रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास बळजबरीने 10 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन व 6 हजार रोख रुपये बळजबरीने हिसकावून नेले होते.

याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात वरवाडे येथील संशयित योगेश उर्फ महेश वसंत कोळी यास अटक करण्यात आली होती व मुकेश सुदाम बाविस्कर हा त्या दिवसापासून फरार होता.दरम्यान शहर पोलिसांकडून शोध घेतला जात होता मात्र मुकेश बाविस्कर हा सतत गुंगारा देत होता.

मात्र शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने एका गोपनीय माहितीवरून सुरत शहरात दोन दिवस कसून शोध घेत सापळा रचून बुधवारी सुरत येथील लिंबायत भागात सकाळी मुकेश बाविस्कर यास ताब्यात घेतले. सदर कारवाही शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.लादूराम चौधरी,पोकॉ.विनोद आखडमल, 
गोविंद कोळी,प्रशांत पवार यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध