Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री आगाराच्या धुळ्याकडून साक्रीकडे येणाऱ्या बसवर दगडफेक साक्री पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल



साक्री प्रतिनिधि - राज्यात मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यावर अद्याप तोडगा निघालेला नसून एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मार्गावर ठाम आहेत त्यामुळे आता राज्य शासनाने खासगी व कंत्राटी चालकांच्या मदतीने राज्य परिवहन मंडळाच्या बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे त्याच देखील विरोध होत असून अनेक ठिकाणी एसटीच्या बसवर हल्ले होताना दिसत आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री आगाराच्या धुळ्याकडून साक्रीकडे येणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली.

यात बसच्या काचा फुटल्याने नुकसान झाले. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री आगाराची बस (एमएच १४ / बीटी- २१३७ ) दि. ११ रोजी रात्री ८. ३० वाजेच्या सुमारास धुळे येथून साक्रीकडे येत असताना साक्री जवळील राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल रॉम जवळ रस्त्याच्या बाजूला काटेरी झुडुपातून अज्ञात व्यक्तीने बसच्या पुढील काचेवर दगडफेक केली. त्यामुळे बसची पुढील काच फुटून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र कोणीही जखमी झाले नाही,अशी माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी बस चालक रफिक पिरन मंसुरी ४३ रा. आदर्श नगर साक्री यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध