Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

महाराष्ट्रात आता किराणा दुकान,व सुपर मार्केटमध्ये मिळणार वाइन, या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी;



राज्यातील सुपर मार्केटस आणि किराणा दुकानांमध्ये वाइन मिळण्याचा मार्ग झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक दुकानांमध्ये वाइन विक्री करता येऊ शकणार आहे. राज्य सरकारने वाईन विकण्याची परवानगी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक म्हणाले. तसेच वाईन विक्री करण्यासाठी हजार फुटांपेक्षा कमी दुकानाला परवानगी देण्यात येणार नाही. परंतु जे सुपरमार्केट आहे. त्या दुकानात वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
निर्णयाला भाजपकडून विरोध
या प्रस्तावाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पीत आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

प्रसिद्ध