Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

भाजपच्या विकृतीला आता पायताणाने जागा दाखवून देऊ - युवतीसेना



    आज पुण्यात युवतीसेनेमार्फत        अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आल. पुण्यातील युवतींनी भाजप आयटी सेलचे प्रमुख जितेन गजरिया यांना पोस्टाने जुने चप्पल पाठवत आंदोलन केलं.
     मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या आयटी सेलच्या जितेंन गजरीया यांनी एक आक्षेपहार्य आणि राजकीयदृष्ट्या केवळ चिखलफेक करणारे ट्विट केलं होतं. त्यावर भाजपच्या कुठल्याही नेत्याने काही प्रतिक्रिया दिल्या नाही म्हणजेच अशा विकृतीला भाजपचे समर्थन आहे का असा प्रश्न उपस्थित होतो की महिलांवर वाटतील ते आरोप करायचे, सोशल मीडिया वरती विक्षिप्त विकृत लिखाण करायचं ही भाजपची संस्कृती आहे का ? असा प्रश्न ही या युवतींनी  उपस्थित केला.
   यावेळी आंदोलनाला युवासेनेच्या सहसचिव कू.शर्मिला येवले,मनीषा वाघमारे, नागपूर विस्तारक शर्वरी गावंडे,कसबा युवती अधिकारी गायत्री गरुड
आदी युवतीसेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
   "भाजपच्या लोकांनी आता समजून घ्या आता तर फक्त चप्पल पाठवत आहोत पण वेळीच जर तुम्ही या  कळलाव्या सूत्रधार विकृतीला आळा घातला नाही तर त्याच पायताणाने ह्या युवती तुम्हाला तुमची जागा दाखवायला ही कमी पडणार नाही. कुठल्याही महिलेचा अपमान सहन करणार नाही हे भाजपने लक्षात घ्यावं आणि यातून काहीतरी बोध घ्यावा ." 
 कु.शर्मिला येवले
युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह 
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध