Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

पिंपळादेवी विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा




धुळे प्रतिनिधी - शहरातील मोहाडी उपनगरातील मनपा शाळा क्रमांक 55, 56,श्री पिंपळादेवी बाल मंदिर ,  प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 73 वा प्रजासत्ताक दिन संस्थाध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचे नियम पाळत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे दिनविशेष प्राचार्य आर व्ही पाटील यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आवाज टिव्ही चॅनल व खान्देश खबरचे संपादक कैलासभाऊ गर्दे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, पालक
-शिक्षक संघाचे पदाधिकारी,ग्रामस्थ यात शिवाजी शिंदे ,डॉ राहुल शिंदे,डॉ शैलेंद्र सूर्यवंशी,आबा पानगे,एस बी पाटील,एस डी बाविस्कर,आकाश शिंदे,शेखर शिंदे,सुरेश देवगावकर,ताराचंद वाघमारे,  नितीन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक वनीकरण स्पर्धा,राष्ट्रीय मतदार दिन निबंध स्पर्धा,शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमात गीतमंचाच्या वतीने विविध देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. 

कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमास मनपा शाळा क्रमांक 55,56 च्या मुख्याध्यापिका श्रीमती भोसले मॅडम,प्राथमिकचे मुख्याध्यापक व्ही बी ठाकरे,उपमुख्याध्यापक के आर सावंत,पर्यवेक्षक एस एस पाटील,व सर्व शाखांचे शिक्षक,शिक्षिका,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध