Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ जानेवारी, २०२२
ढगाळ वातावरण व धुक्यामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी धास्तावले .
मुंबई सह कोकणात सातत्याने पडणाऱ्या अवेळी पावसामुळे व धुक्याने आंबा आणि काजू उत्पादक धोक्यात आलेले असतानाच पुन्हा एकदा गेली दोन दिवसापासून आलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत.
गेली दोन दिवसापासून महाडसह राज्यातील विविध भागात अवेळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून त्यानुसार काही भागात पाऊस पडत आहे. महाड तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात आलेला आंब्याचा मोहर गळून पडला आहे तर काजूला आलेला मोहोर देखील त्या वातावरणामुळे खराब होत आहे. यापूर्वीच सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे यावर्षी आंबा आणि काजूला मोहर आलेला नाही यामुळे आंबा उत्पादन कमी प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असतानाच अवेळी पावसाने किरकोळ प्रमाणात आलेला आंबा आणि काजू मोहर नष्ट होणार आहे. महाड तालुक्यात काही भागात पाऊस शिंपडून गेल्याने वातावरणात पुन्हा बदलला झाला आहे. रविवारी संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने आंबा आणि काजू फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाड तालुक्यात कृषी विभागाच्या यादीनुसार जवळपास 250 आंबा उत्पादक आहेत. या उत्पादकांना यावर्षी आंबा पीक घेताना बदलत्या वातावरणाचा परिणाम सहन करावा लागणार आहे. आंबा उत्पादन कमी प्रमाणात येणार असल्याने आंबा अधिक दराने बाजारात येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली. ढगाळ वातावरणामुळे आलेला मोहोर गळून जाण्याबरोबरच त्याच्यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा