Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चा सेवाभावी उपक्रम मकर संक्रांति निमित्त गरजु कुटुंबांना शिधा पत्रिका वाटप..!



शिरपूर प्रतिनिधी :आज दिनांक 14/1/2022 वार शुक्रवार रोजी मकर संक्रांति दिनानिमित्त शहरातील व तालुक्यातिल काही गरजु कुटुंबांना जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून तसेच शिरपुर तालुक्याचे कर्तव्यदक्ष अभ्यासु तहसीलदार सन्माननिय श्रीआबासाहेब महाजन,पुरवठा निरीक्षक सौ.प्राजक्ता सोमवळकर,पुरवठा अव्वल कारकुन सौ.दीपाली अशोक दाभाड़े यांच्या अप्रतिम सहकार्याने मंगेश भील,पंढरी शंकर गोपाळ,दगुताई संजय गोपाळ,ज्योति भील,नान्या टीना पावरा,अल्काबाई राजेंद्र कोळी व इतर गरजु कुटुंबांना जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष रामचंद्र येशी,बंडूनाना राऊळ यांच्या माध्यमातून शिधा पत्रिकेचा लाभ मिळवुन  देण्यात आला 

मकर संक्रांति च्या पवन पर्व निमित्त शिधा पत्रिका मिळाल्याने उपस्थित कुटुंबातील सर्वच सदस्य यांना द्विगुणित आनंद झाला प्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष विकास सेन यांनी तहसीलदार आबा महाजन,पुरवठा निरीक्षक,व पुरवठा अव्वल कारकुन यांचे आभार मानले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध