विद्या हिचे प्राथमिक शिक्षण भूम तालुक्यातील घाटनांदूरच्या मामाच्या गावातील प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण जि.प.प्रा शाळा ईट ता.भूम येथे झाले व उच्च्य माध्यमिक शिक्षण जय क्रांती ज्युनियर कॉलेज लातूर येथे करून, बी.कॉमचे शिक्षण बीपी साळुंखे कॉमर्स कॉलेज बार्शी येथे पूर्ण केले.दोन वर्षांपासून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची तयारी भूम येथील थ्रीएस अकॅडमीत केली.150पैकी 118गुण घेऊन अंतीम गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.या यशामुळे पांढरेवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ‘विद्या’ बनली पोलीस शिपाई..!
परंडा(राहूल शिंदे)दि.14 तालुक्यातील पांढरेवाडी पश्चिम येथे मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या कु.विद्या बाळासाहेब कोकणेे यांचा व कुटुंबीयांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.आपल्या देशात महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार समाधानकारक नाही.कारण आजही महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. विशेषतः ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण असो की महिलांचे सक्षमीकरण आपल्याकडे परिस्थिती तेवढी चांगली नाही. अश्या परिस्थितीत परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील शेतकरी बाळासाहेब कोकणेे यांच्या मुलीने मुंबई पोलीस भरतीत यश मिळविले आहे.तिची पोलीस शिपाई पदी निवड झाली आहे.
सदर सत्कार समारंभाच्या सोहळ्यास जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक खटके सर, युवराज पवार, गणेश भिल्लारे, योगेश भिल्लारे, हरिभाऊ भिल्लारे, तात्यासाहेब शिंदे, कोकणे सर, शरद पवार सर, औताडे सर, चंद्रहार खटके सर, नाना पवार, राजु जरांडे, बापू शिंदे, दादा पवार, नानासाहेब बाटे, गणेश पवार व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक खटके सर यांच्या हस्ते कोकणेे परिवाराचा नागरी सत्कार करण्यात आला.अंगणवाडी सेविका सारिका भिल्लारे यांनी बालविवाह निर्मूलन व मुलींच्या शिक्षणाचे महत्व ग्रामस्थांना पाठवून दिले.व बालविवाह नकरण्याचे व मुलींना शिक्षण देण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार सर यांनी केले तर आभार कोकणे सरांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर येथे एका तरुणाने 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये असलेल्या युवतीसोबतचे नाते तुटल्यामुळे संतापातून तिचे आक्षेपार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा