Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ जानेवारी, २०२२

दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी; कसं असेल राज्यातलं मिनी लॉकडाऊन!



मुंबई: करोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रात अखेर रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तर जिम, स्पा आणि स्विमींग पूलही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.तर खासगी कार्यालये, हॉटेल्स, नाट्यगृह, थिएटर्स आणि सलून्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. तर मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ या वेळेतच सुरु ठेवता येतील. तर मैदाने, उद्याने आणि पर्यटनस्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. काय आहे नियमावली?  पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी सरकारी कार्यालयांमध्ये व्हिजिटर्सना परवानगीशिवाय प्रवेश नाही. 

लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध नाहीत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी विवाह सोहळ्याला फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार अंत्यविधीला २० जणांना उपस्थित राहता येणार राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ५० जणांच्या उपस्थितीची अट शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. स्विमींग पूल्स,स्पा,जिम,वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून्स पूर्णपणे बंद राहणार केशकर्तनालय (सलून्स) ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. सलून्स सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरु ठेवता येणार नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध