Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ जानेवारी, २०२२

धुळे शहर पोलीस ठाणे शोध पथकाची विशेष कामगिरी.



धुळे प्रतिनिधी : दि.९ जानेवारी धुळे शहरात दिवाळी नववर्ष व आगामी सण उत्सव लोकांना निर्भय पणे साजरे करता यावे याकरीता मा.पोलीस अधीक्षक श्री.प्रविणकुमार पाटील सो.यांनी आदेशित केले होते.त्या अनुषंगाने वेळोवेळी रात्रगस्त व कोबिंग ऑपरेशन धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांना आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने पो. निरीक्षक श्री.नितीन देशमुख सो. यांचे गोपनिय बातमीदाराने दिलेल्या बातमी वरुन धुळे शहर पोलीस ठाण्याचे शोध पथकातील अंमलदारांना त्यांचे दालनात बोलवुन कळविले की, आदित खिमशंकर भट्ट वय २२ रा. मनमाड जिन पाण्याच्या टाकी समोर धुळे हा अंगात काळया रंगाचा टी-शर्ट (हुडी) व राखाडी रंगाची पॅन्ट परीधान केलेला इसम हा त्याचे कब्जात गावठी बनावटीचा पिस्टल व जिंवत काडतुस सामान्या लोकांना मध्ये दहशत अगर काही तरी दखलपात्र अपराध करण्याच्या उददेशाने कब्जात बाळगुन आहे. 

बाबत खात्री करून कारवाई बाबत आदेशीत केल्याने शोध पथकाचे अंमलदार यांनी दोन पंचासह बातमीची खात्री करुन दिनांक ०९/०१/२०२२ रोजी ००.०५ वाजता धुळे शहरातील ज्योती टॉकीज च्या बाजुला असलेले विजय व्यायमशाळेच्या समोर रोडवर आदित खिमशंकर भट्ट यास घेराव करुन ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेता त्याचे कमरेला डाव्या बाजुस एक पिस्टल व पॅन्ट च्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतुस असे एकुण २६,०००/- रुपये किमंतीचे अनधिकृत शस्त्र कब्जात बाळगातांना मिळुन आला बाबत धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. १२/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकॉ/२८९ व्हि.आर.भामरे आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील सो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव सो, मा. उप वि.पो.अधिकारी श्री. दिनकर पिंगळे सो. यांचे मार्गदर्शना खाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख तसेच शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोहेकॉ/ विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, पोकॉ/ निलेश पोतदार,अविनाश कराड, तुषार मोरे, शाकीर शेख, प्रसाद वाघ यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध