Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

नंदुरबार तालुका पोलीसांची दमदार कामगिरी,रेशनिंगचा भरलेला ट्रकसह 14 लाखाचा मुद्देमाल केला जप्‍त.



नंदूरबार तालुका पोलीस स्टेशन त्यांच्या हद्दीतील चौपाळे फाट्यावर दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-18-AA-6922 हा येत असल्याचे पाहून सदर ट्रकला तपासणीसाठी थांबले असता त्यात रेशनिंगच्या तांदूळ दिसून आला.म्हणून त्या ट्रकला नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन येथे आणून त्याची पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत पंचनामा करत तो रेशनिंगच्या तांदूळ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपी मलक अलीम मलक सलीम वय- 34 वर्ष (चालक)व मोबीन मलिक सलीम मलिक वय-30 रा.उमर फारूक मशिद जवळ, ईदगाह नगर शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चालकाला सर्व हकीकत विचारली असता हा रेशनिंगचा तांदूळ कापडणे ता.जि.धुळे येथुन भरून (गांधीधाम) गुजरात येथे काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असतानाही कार्यवाही करण्यात आली.यातील मुख्य सूत्र्धार कोन असा प्रश्न निर्माण झाला आहे.या कार्यवाहीत 5 लाख 25 हजार 780 रुपयांच्या 254 क्विंटल तांदूळ व 9लाख रुपये किमतीच्या टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण 14 लाख 25 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलीस स्टेशन जप्त करत कार्यवाही करण्यात आली आहे. या दोघां विरुद्ध पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय नंदुरबार समराज गंभीर वाडेकर वय-55 यांनी फिर्याद दाखल करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे करीत आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह, 
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध