Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत खर्दे विद्यालयात सिकलसेल जनजागृती व तपासणी शिबिर संपन्न....!
मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत खर्दे विद्यालयात सिकलसेल जनजागृती व तपासणी शिबिर संपन्न....!
शिरपुर प्रतिनिधी: द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मुकेशभाई पटेल चॅरीटेबल ट्रस्ट,एच.आर.पटेल फार्मसी कॉलेज आणि उपजिल्हा रुग्णालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने खर्दे येथील आर. सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सिकलसेल बाबत जनजागृती व तपासणी शिबिर घेण्यात आले.
मुकेश भाई पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यालयातील इयत्ता 9 वी व 11 वी च्या एकूण शंभर विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सिकलसेल संदर्भात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सविस्तर असे विवेचन प्रा.डॉ. डी .डी .पाटील यांनी केले.
याप्रसंगी मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रकल्प संचालिका पोर्णिमा पाठक, एच .आर. पटेल फार्मसी कॉलेजचे प्रा.डॉ. डी. डी. पाटील,शिरपूर उपजिल्हा रुग्णालय आहार तज्ञ डॉ.श्वेता पोलशेट्टीवार. पंकज चव्हाण, कुणाल सोनवणे ,विद्यालयाचे प्राचार्य पी.आर. साळुंखे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव, छाया पाटील,पी.बी.धायबर,सिनेट सदस्य अमोल सोनवणे ,हितेंद्र देसले, डी.एम.पवार.ए जे पाटील,मनीषा पाटील,सीमा जाधव,सुनीता सूर्यवंशी,युवराज मिठभाकरे आदि विद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा