Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

शिरपूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमदार काशीराम दादा पवार यांच्या उपस्थितीत साजरा



शिरपूर (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रजाहित दक्ष आदर्श राज्यकर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 व्या जयंतीनिमित्त शिरपूर वळवाडे नगर परिषदेच्या शिवाजी मार्केट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती शिरपुर चे आमदार श्री काशीराम दादा पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री प्रमोद भामरे शिरपूर पोलिस स्टेशनचे पीआय रवींद्र देशमुख नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी संजय अस वाणी नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजू टेलर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत तसेच शिरपूर तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश मारवाडी माजी नगरसेवक सोनू होणार अपाचे भरती शी पोलीस खात्याचे हेमंत पाटील व इतर मान्यवरांसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते मान्यवरांनीही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व आरती करून अभिवादन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध