Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
दोंडाईचा शिवारातुन ठिंबकची नळी चोरताना, नाशिक जिल्ह्यातील काका-पुतण्याला अटक...! पंच्यात्तर हजाराची ठिंबक नळीसह गुन्ह्यात वापरलेले दोन लाखाचे वाहन जप्त...! सततच्या चोरीच्या घटनेवर,दोंडाईचा पोलीसांची तात्काळ कार्यवाही..
दोंडाईचा शिवारातुन ठिंबकची नळी चोरताना, नाशिक जिल्ह्यातील काका-पुतण्याला अटक...! पंच्यात्तर हजाराची ठिंबक नळीसह गुन्ह्यात वापरलेले दोन लाखाचे वाहन जप्त...! सततच्या चोरीच्या घटनेवर,दोंडाईचा पोलीसांची तात्काळ कार्यवाही..
दोंडाईचा- गावात सतत चोरी होणाऱ्या घटनेच्या पाश्वभुमीवर मांडळ शिवारात शेत असलेल्या दोंडाईचा येथील श्री संतोष पाटील यांच्या शेतात काल दिनांक ८ फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री अज्ञात चोरांनी ठिंबक नळी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र शेती मालकने वेळेवर-तात्काळ दोंडाईचा पोलीसांना दिलेल्या माहितीमुळे नाशिक-धुळे जिल्ह्यातील काका-पुतण्याला चोरीच्या मालासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे दोंडाईचा पोलीसांच्या तात्काळ कार्यवाहीने नागरिक सुखावले असुन, ह्या अगोदरही गावात झालेल्या चोरांच्या तपास असाच जलद गतीने लावावा,अशी अपेक्षा ज्यांच्याकडे चोरी झाली आहे,त्यांच्या वाढल्या आहेत.
याबाबत दोंडाईचा पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,काल दिनांक ८ फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री ९.०० वाजता श्री संतोष पुंडलिक पाटील, राहणार-दोंडाईचा यांचे मांडळ शिवारात शेत आहे. त्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी त्यांनी पंच्याहत्तर हजाराचे ठिंबक खरेदी करून ठेवले होते.मात्र काही अज्ञात व्यक्तीनी जसे हे ठिंबक चोरले.तसेच ते शेतात गेल्यावर त्यांचे लक्षात आले व त्यांनी तातडीने दोंडाईचा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांना माहिती दिली.श्री दुर्गेश तिवारी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे टिम बनवत.अज्ञात चोरांच्या मागावर लागले व काही कालावधीत त्यांनी ताहराबाद ता.सटाणा,जि.नाशिक व शेवाळी-साक्री येथील नात्याने काका-पुतण्या असलेले श्री मनोहर उत्तम गवारे,रा.शेवाळी,ता.साक्री व श्री कुणाल दिलीप गवारे, रा.इंदिरानगर तारहाबाद,
ता.सटाणा, जि.नाशिक येथील दोघांना मालवाहतुक टाटा एस. कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.१५-ईजी-७७६० गाडीत ठिंबक असलेल्या मालासह ताब्यात घेतले.
यावेळी त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजाराचे ठिंबकच्या पाण्याचे काळ्या रंगाचे पाईप असलेल्या १७०/ नळींचे बंडल व दोन लाख रूपये किंमत असलेली पांढऱ्या रंगाची माल वाहतूक टाटा-एस. कंपनीची वरील क्रमाकांची गाडी जप्त करण्यात आली आहे.
तसेच ह्या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांच्या टिममध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेश मोरे,हवलदार श्री संजय चव्हाण, पोलीस नाईक मोहनराव पाटील, शिपाई योगेश पाटील आदींचा समावेश होतो
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा