Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
फागणे गावातील आदिवासी वस्तीत सुशोभीकरण कामाचे उद्घाटन...!
(धुळे तालुका प्रतिनिधि -: समाधान देवरे) धुळे तालुक्यातील फागणे गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन 15 वित्त आयोगा अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतुन आदिवासी वस्ती मध्ये विर एकलव्य पुतळ्यासमोर सव्वा लाख रुपयाच्या निधीतून सुशोभीकरण कामाचे उद्घाटन सरपंच व गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते करण्यात आले,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरे,व संदीप मोरे यांनी आदिवासी वस्तीमध्ये मूलभूत सोयीसुविधा व सुशोभीकरणाच्या समस्याबाबत फागणे ग्रामपंचायत प्रशासनाला पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला आज यश आले आहे अखेर सरपंच कैलास पाटील यांनी आज 15 वित्त आयोग अंतर्गत ठक्कर बाप्पा योजने च्या माध्येमातुन आदिवासी वस्ती मधील विर एकलव्य पुतळ्यासमोर पेवर ब्लॉक बसवण्या च्या कामाला सुरुवात करण्यात आली, सुशोभीकर कामाचे उद्घाटन आज रोजी करण्यात आले.या कामाचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरे व संदीप मोरे यांनी केला होता आज रोजी कामाला सुरुवात झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे या वेळी आभार मानले,उद्घाटन प्रसंगी सरपंच कैलास नाना पाटील, गटनेते व मा. लोकनीयुक्त सरपंच विलास आण्णा चौधरी,मा. सरपंच शिवाजी अहिरे, उपसरपंच भारती संजय चौधरी,तसेच सदस्य युवराज सूर्यवंशी, विक्रम पाटील,वसंत पाटील,महेश अहिरे , राजेश बडगुजर ,भिकन जाधव,राकेश पाटील ,नगराज पाटील,भास्कर सूर्यवंशी , कैलास अहिरे ,शशिकांत सोनार, उर्मिला दिलीप पाटील,पुष्पा सुभाष पाटील , तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप मोरे, प्रवीण मोरे व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा