Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

नाशिक येथिल आस्था अनघादि फाउंडेशनचा उपक्रम चला उद्योजक बनवूया, महिलांनी मोबाईल हाताळताना घ्यावयाची काळजी.....




नाशिक प्रतिनिधी:दिनांक 10/ 2 /22 रोजी नाशिक सातपुर येथे आस्था अनघादि फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशालीताई निर्मला बापुराव चव्हाण,आणि सातपुर शहर अध्यक्ष सौ.सारिता चंद्रकांत कोळी यांनी आयोजित केलेला उपक्रम चला महिला उद्योजक बनवूया.आणि मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी,तसेच त्याचा सदुपयोग कसा करता येतो.याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. 


त्यासोबत अति मोबाईल वापरल्याने काय दुष्परिणाम होतात हे ही सांगण्यात आले. या प्रशिक्षणात आस्था अनघा दि फाऊंडेशनच्या युवा अध्यक्ष कुमारी अनघा सौंदाणे यांनी महिलांना दैनंदिन जीवनात मोबाईल वापर करण्यात येणारे मोबाईल ॲप कसे वापरावे यावर माहिती दिली.
जसे घरच्या घरी फोन बिल ,लाईट बिल कसे भरावे,बँकिंग सेवा,ऑनलाइन पेमेंट ची माहिती देण्यात आली.पेपर वाचन,
त्याचप्रमाणे माहिती इ प्रशिक्षण दिले गेले.

आणि उद्योग या संदर्भात 1,2 महिला किंवा जास्त महिला मिळून कोण कोणते व्यवसाय केले जाऊ शकतात.ते कशाप्रकारे करु शकतो.यावर चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले .विशेषतः महिलांना यात रुची असल्याने लवकरच उद्योग सुरू केला जाणार आहे.असे  वैशाली ताई चव्हाण यांनी सांगितले.या उपक्रमात मनीषा शेवाळे,उषा निकम,पूजा कोळी ,दिपाली कोळी,सरला वाघ,निर्मला कोळी, अनिता मोरे,धनश्री सूर्यवंशी आदींनी सहभाग नोंदवला.

वैशाली निर्मला बापुराव चव्हाण
आस्था अनघादि फौंउडेशन
रुक्मिणीबाई चॅरिटेबल ट्रस्ट





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध