Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

आजादी का अमृत महोत्सव निमित्त सैताळे येथे कार्यक्रम संपन्न..!



सैताळे ता.जि.धुळे : (प्रतिनिधी) सैताळे येथे आत्मनिर्भर भारत निमित्त कार्यक्रम दि.९ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. नेहरू युवा केंद्र धुळेशी संलग्न रूपेश शैक्षणिक बहुद्देशीय संस्थे अंतर्गत १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना बेरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजिक केला होता. कार्यक्रमात सुत्रसंचालन संस्थेचे अध्यक्षा यादव बुवा यांनी केले. कार्यक्रमात अध्यक्षस्थान नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अधिकारी अशोक मेघवाल उपस्थित होते. 


प्रमुख पाहूणे म्हणून धुळे येथील कृषी सहाय्यक सौ.प्रतिभा पाटील, कृषी पर्यवेक्षक कैलास तेले,महानगरी पतपेढीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, रोहीणी येथील उपशिक्षक सुरेश आडगाळे सर, सरपंच रविंद्र पाटील उपस्थित होते.

सौ.प्रतिभा पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी मा हिती सांगितली व शेळी, मेंढी पालन विषयी यादव बुवा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील ७० ते ८० बेरोजगार तरुण व महिलांनी उपस्थिती लावली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध