Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

शिंदखेडा तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करण्यात येणार... जि. प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे



शिंदखेडा मतदार संघामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात आलेले बंधारे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक बंधारे फुटून दुरुस्ती करण्यास लागत आहेत. तिन चार वर्षापूर्वी तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत या तालुक्याचे आमदार तथा मा. मंत्री जयकुमार रावळ हे मंत्री असताना अनेक बंधारे मंजूर झाले होते व ते सर्व काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली होती आणि ती सर्व अत्यंत नित्कृष्ठ दर्जाची आहेत ती सर्व बंधारे दुरुस्ती करावी म्हणून मी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचा समितीवर सदस्य असल्याने पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं होतं की माझ्या मेथी गटासह तालुक्यातील सर्वच तीन चार वर्षांमध्ये खराब झालेले, नादुरुस्त झालेले बंधारे आहेत त्यांची सर्वांची सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी आणि म्हणून जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता मार्फत अनेक बंधाऱ्यांचा सर्वेक्षण करण्यात आले. 

 मेथी गटातील परसोळे, खर्दे, देवी अशा बंधाऱ्यांची दुरुस्ती मागच्या वर्षी मी करून घेतली. मात्र त्या ठिकाणी ना भूमिपूजनला गेलो, ना उद्घाटनास गेलो कारण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर काम करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यअसते आणि ज्या गटातून आपण निवडून येतो तेच लोक आपल्याला निवडून देतात म्हणून तिथलं काम करणे आपले कर्तव्य असते. आपण फक्त निमित्त असतो काम हे त्या मतदारांच असते अशा प्रकारची भावना माझी आहे आणि म्हणूनच मी भूमिपूजनला किंवा उद्घाटनाला प्राधान्य न देता काम करणे हे कर्तव्य समजतो.मात्र आमदार जयकुमार रावळ हे स्वतः आणि त्यांच्याकडे नोकरीला असलेले काही कार्यकर्ते उदाहरण दाखल मांडळ येथील रामकृष्ण मोरे असतील किंवा कर्ले येथील दिनेश ठाकरे असतील हे त्यांच्याकडे संस्थेत नोकरीला जरी असले तरी रावळ यांचे गुलाम आहोत असं दाखवण्यामध्ये त्यांची चढाओढ असते व त्यातच स्वतःला ते धन्य समजतात आणि म्हणून माझ्या गटातील कामांचे ज्या गटाचा मी जिल्हा परिषद सदस्य आहे. 

तेथील कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करीत असल्यामुळे मी आता काही ठिकाणी भूमिपूजन करावे असे ठरवले आणि म्हणून काल मांडळ येथील दोन बंधारे ( ज्यांचे काम जरी ४ वर्षापूर्वी दुसऱ्याच्या नावावर होते तरी ते निकृष्ट दर्जाचे काम जयकुमार रावळ आणि त्यांचे हस्तक रामकृष्ण मोरे मार्फत करून घेतले होते )या गावाच्या भूमिपूजनासाठी मी शाखा अभियंता हर्षल पाटील उपअभियंता ए.सी पाटील कॉन्टेक्टर प्रितम पाटील हे सर्वं माझ्या सुचने नुसार माझ्या सोबत मांडळ येथे अकरा वाजता आले होते व रीतसर तेथील काम करणाऱ्या ठेकेदारांच्या सोबत कामाचे भूमिपूजन अधिकृत केलं परंतु ज्याला फक्त आणि फक्त चमचेगिरी करायची आहे. 

रामकृष्ण मोरे यांनी तेथील अत्यंत सज्जन असलेले सरपंचांना व काही अत्यंत सज्जन अशा शेतकऱ्यांना खोटे बोलून सोबत घेऊन बंधाऱ्याच्या ठिकाणी भूमिपूजन केले. त्याची बातमी आज काही वर्तमानपत्रात आलेली आहे म्हणून माझा हा खुलासा आहे की मांडळ या गावामध्ये भांडण व्हावी हा उद्देश त्यांचा होता वास्तविक पाहता त्या गावांमध्ये पंचायत समितीचे सदस्य सुद्धा राहतात परंतु या गावांमध्ये एकोपा राहू नये म्हणून जेणेकरून मुद्दाम गावात वाद घालण्याचा प्रयत्न आमदार जयकुमार रावळ यांनी रामकृष्ण मोरे यांच्यामार्फत भांडण लावण्याचा प्रयत्न केला मात्र मांडळ गाव आता अत्यंत ऐकोप्याने राहत आहे. 

येथील लोकांना माहीती आहे की रामकृष्ण मोरे तिथं नोकरीला आहे म्हणून त्याला जास्तीचे महत्त्व न देता त्या गावात शांतता राहील अशा प्रकारचाच प्रयत्न समस्त शिंदखेडा मतदार संघातील गावांनी करायचा आहे.असो काल मी मांडळ चे भूमिपूजन केले आहे तसेच मेथी गावातील सुध्दा दोन बंधारे त्यांच्या हस्तका मार्फत काम करण्यात आले होते त्यांचे सुद्धा भुमीपुजन कालच केले आहे. मी जिल्हा परिषदेतील जलसंधारण समीतीचा सदस्य असल्यामुळे मला हे सर्व करता आलेला आहे. परंतु खोटे श्रेय घेऊन गावागावांमध्ये भांडणे लावण्याचं षड्यंत्र जयकुमार रावळ यांनी अनेक वषापासुन केलेले आहे.

माझ्या सर्व तालुक्यातील व मतदार संघातील जनतेला आव्हान आहे की आपल्या गावागावांमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडणं होऊ देऊ नका ज्या पद्धतीने गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये सतारे, वणी, पथारे या गावांमध्ये जयकुमार रावल यांच्या व्यक्तीरीक्त इतर दुसऱ्या कोणत्याही विरोधी उमेदवाराला मते मिळत नाहीत. किंवा विरोधात दुसऱ्या राजकीय पक्षाचा गट उभा राहत नाही तसाच प्रकारचा एकोपा आपण तालुक्यातील सर्व गावांमध्ये निर्माण करावा अशी सर्व कार्यकर्त्यांना नतमस्तक होऊन मी आज विनंती करत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


1 टिप्पणी:

प्रसिद्ध