Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सुशोभीकरण करा! लोकशक्ती पार्टीचे मनपा प्रशासनाला निवेदन...!




धुळे प्रतिनिधी - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती येवू घातली आहे.14 एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या जयंतीची आतुरता दिसून येत आहे.त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बस स्थानकाजवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी आज महापालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांना लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.

सदर हे निवेदन लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आल आहे...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा परिसरात कुठल्याही प्रकारचे सुशोभीकरण अथवा विकास कामे  झालेले दिसून येत नाही त्यामुळे आगामी येवू घातलेल्या महामानवाच्या जयंतीपूर्वी तेथील परिसरातील भूमिगत गुटारीचे काम व तहसिल कार्यालय ते संतोषी माता चौक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती  स्मारकापर्यंत रस्ता डांबरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे.महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ असलेल्या गटारी ह्या उघड्या अवस्थेत असून त्यांच्यावर तात्काळ सिमेंटचे ब्लॉक बसवून त्या झाकण्यात याव्यात व मध्यवर्ती पुतळ्याच्या गोलाकार भागात असलेल्या रस्त्याच्या चोही बाजूने फेवर ब्लॉक बसवण्यात यावे.परिसरातील रस्त्याच्या बाजूने असलेल्या वृक्षांची छाटणी करून स्ट्रिट लाईट व हॅमस्ट लाईटची ही सुविधा उपलब्ध करून द्यावी..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची निघा राखण्यात यावी.अशी मागणी आज लोकशक्ती पार्टीच्या वतीने धुळे महापालिका प्रशासनाला करण्यात आले आहेत.

सदर निवेदन देते वेळी लोकजन शक्ती पार्टी चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे धुळे जिल्हा महिला अध्यक्षा सौ शोभाताई चव्हाण,महासचिव कुंदन खरात,मधुकर चव्हाण,सागर चव्हाण, शुभम साळवे,सूरज साळवे,गौतम सोनवणे,प्रमोद सोनवणे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध