Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी व जनरेटर चोरी करणाऱ्या चोरांना जायखेडा पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत केले जेरबंद.



सटाणा:-
तालुक्यातील अंतापुर येथील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटर व दसवेल शिवारातील एका वीटभट्टी वरील जनरेटर चोरी गेले होते. याबाबत जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या बारा तासांच्या आत आरो पितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अंतापुर तालुका सटाणा गावाच्या शिवारात शेख गुलाब शेख रफीओदिन व बाबू शेख हमीद यांची शेत जमीन असून ती जमीन दीपक संजय गवळी राहणार अंतापुर हे निम्म्या वाट्याने करत असून त्या शेतात असलेल्या विहिरीवर इलेक्ट्रीक मोटारी बसवलेल्या होत्या रात्रीच्या सुमारास शेतात अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी या दोन्ही मोटारी चोरी करत आपला मोर्चा पुढे वळवत दसवेल शिवारात दिलीप चावदस कुंभार यांची वीट भट्टी असून त्या ठिकाणी असलेले जनरेटर देखील चोरट्यांनी चोरून नेले याबाबत जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण पुष्कराज सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी मुल्हेर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व पोलीस शिपाई बारगळ यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी आपले कसब पणाला लावून अवघ्या बारा तासांच्या आत सदरची चोरी करणाऱ्या सचिन रमेश सोनवणे रवींद्र भाऊ सिंग माळी राहुल लक्ष्मण माळी संदीप साहेबराव सोनवणे सर्व राहणार तेलदरा तालुका सटाणा ह्या चार आरोपीना अटक करत त्यांच्याकडून चोरी करते वेळी त्यांनी वापरलेली एम एच 41 सी 42 77 या क्रमांकाची चार चाकी इंडिगो कार व चोरी झालेला सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .
जायखेडा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध